Home महाराष्ट्र सोयगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

सोयगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

सोयगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

 

 

“स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून समाज परिवर्तनाची शक्ती आहे; शिक्षित आणि सक्षम महिला म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठीचा मजबूत पाया

 

 

सोयगाव : प्रतिनिधी, दत्तात्रय काटोले

 

 

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे दिनांक ७ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, माता रमाई आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

 

या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जि.प. सदस्या मा. पुष्पाताई काळे, सोयगाव नगराध्यक्षा मा. आशाबी तडवी, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या मा. सविता ताई गव्हाडे, नगरसेविका मा. कुसूमताई दुतोंडे, माजी विद्यार्थीनी निशा मधुकर पगारे, तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मा. उज्वला वामने तसेच पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मा. दौड साहेब उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शविली. सोयगाव केंद्र प्रमुख मा. फिरोज तडवी तसेच पदाधिकारी, महिला माता-पालक यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

 

कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. शाळेच्या कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. दिपाली निकुंभ (अबाजोगाई), डॉ. सोनाली निकुंभ (चिकलठाणा), मा. चारुशिला पाटील (स्वीय सहाय्यक, मंत्रालय मुंबई), मा. प्राजक्ता रोकडे, डॉ. ज्योती पंडीत (वैद्यकीय अधिकारी) तसेच मा. प्रीती दामधर (करनिरीक्षक, न.पा.) यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

 

सर्व मान्यवरांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत शाळा डिजिटल झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. समाजसेवक राजू दुतोंडे, सुनिल गावंडे, विजय काळे, अंकुश पगारे, मयूर मनगटे, प्रशांत जाधव यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी नवनिर्वाचित जि.प. सदस्या पुष्पा काळे आणि माजी विद्यार्थीनी निशा पगारे यांनी विद्यार्थ्यांना व माता-पालकांना मार्गदर्शन केले. तसेच इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या १७ विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील, सुरेखा चौधरी, पंकज रगडे, मंगला बोरसे, रामचंद्र महाकाळ, सविता पाटील, गणेश बाविस्कर, प्रतिभा कोळी, अंकुश काळे, विवेक महाजन, अनिल देसाई, तान्हाजी चव्हाण, शुभम देसले आणि पुनम लाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन सविता पाटील यांनी केले.

 

विशेष विचार :

 

“स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नसून समाज परिवर्तनाची शक्ती आहे; शिक्षित आणि सक्षम महिला म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठीचा मजबूत पाया.

 

फोटो, दत्तात्रय काटोले

Don`t copy text!