नगरदेवळा जि.प.उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

नगरदेवळा जि.प.उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी जि.प.उर्दू शाळा नगरदेवळे येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.यावेळी गावातील मान्यवर, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष *शेख अफरोज रहीम* यांच्या शुभहस्ते झंडा फडकवण्यात आला. झेंडेला सलामी व व राष्ट्रगीत नंतर शाळेचे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केला. मान्यवरांचे हस्ते त्यांना बक्षीस हि देण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख वसीम गुलाम गौस, सदस्य अफरोज रहीम,वसीम पटवे,उमर बेग, मुशताक खान, मोहसीन शेख, अन्सार शेख व मोठी संख्या मध्ये पालक वर्ग उपस्थित सांस्कृतिक कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी मुख्याध्यापक अजहर शेख, उपशिक्षिका दिलारा सय्यद, इरफाना अन्सारी यांनी परिश्रम घेतले.