पाचोरा मराठा महासंघाची बैठक उत्साहात

पाचोरा मराठा महासंघाची बैठक उत्साहात

पाचोरा — अखिल भारतीय मराठा महासंघाची पाचोरा तालुकास्तरीय बैठक शनिवार दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल भिडे, तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे, यांचे सह जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारिणीचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख पदी खुशाल भिडे (चाळीसगाव) यांची नुकतीच नियुक्ती झाली, या निमित्ताने त्यांचा सत्कार या बैठकीत करण्यात आला. मराठा महासंघाचे माजी अध्यक्ष कै. आप्पासाहेब पवार यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त 7 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या नियोजनाबाबत विचार विनिमय करण्यात आला. या बैठकीत जिल्हा व तालुका कार्यकारीणींचा विस्तार, तसेच मराठा समाज संघटन या प्रमुख विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. गणेश शिंदे हरिभाऊ पाटील सुरेश पाटील प्रवीण पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

या बैठकीत पाचोरा येथील गणेश शिंदे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी, हरिभाऊ पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, पत्रकार सुरेश पाटील यांची जिल्हा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. तर चाळीसगाव कार्यकारणी च्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या बैठकीला तालुका सहसचिव चंद्रकांत पाटील सर, युवक तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील, सोमनाथ पाटील, दीपक मुळे, उमेश पाटील (अमळनेर), नंदकिशोर पाटील, (चाळीसगाव), दिलीप पाटील, निळकंठ पाटील, अनिल गुंजाळ, सचिन पाटील, किरण देवरे, चेतन पाटील, शरद पाटील, रोहित पाटील, शांताराम चव्हाण, निलेश पाटील, नंदू शेलकर, प्रमोद पाटील, चेतन पाटील, सचिन पाटील, स्वप्नील बागुल आदी कार्यकारणी सदस्य व मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सी.बी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले सचिन पाटील यांनी आभार मानले.