Home महाराष्ट्र सोयगाव : येथील तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन

सोयगाव : येथील तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन

सोयगाव : येथील तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले

 

 

 

सोयगाव, दत्तात्रय काटोले

निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –

मक्का खरेदीसाठी निश्चित केलेला लक्षांक तात्काळ वाढवून द्यावा.

ज्या शेतकऱ्यांची मक्का खरेदी पूर्ण झाली आहे, त्यांचे पैसे त्वरित त्यांच्या बँक खात्यात जमा करावेत.

सन २०२४ मधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने खात्यावर वर्ग करावे.

ज्या शेतकऱ्यांचे रेशन बंद असल्यामुळे अनुदानाची रक्कम अडकली आहे, त्यांना ती तातडीने देण्यात यावी.

यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस सुनील भाऊ गावंडे, शहराध्यक्ष तथा खरेदी-विक्री संघ संचालक मंगेश भाऊ सोहनी व मयूर मनगटे , तसेच भैय्या परदेशी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Don`t copy text!