Home महाराष्ट्र जिल्हा परिषद प्रशाला, सोयगाव येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS)...

जिल्हा परिषद प्रशाला, सोयगाव येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश

जिल्हा परिषद प्रशाला, सोयगाव येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश

 

 

सोयगाव : प्रतिनिधी दत्तात्रय काटोले

जिल्हा परिषद प्रशाला, सोयगाव येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत प्रथमच तब्बल १२ विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. या यशामुळे परिसरात समाधान व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये वैष्णवी कडुबा ढगे, देवयानी गोपाल औटे, नेहा शिवदास आस्वार, अक्षरा परशुराम पंडित, पलक भागवत गायकवाड, देवयानी निलेश मिसाळ, तेजस समाधान भोकरे, गायत्री भगवान बावस्कर, पूजा शिवाजी बावस्कर, प्रांजली राजेंद्र खलसे, वृषाली गोपाल साळुंखे व पार्थ समाधान इंगळे यांचा समावेश आहे. काही विद्यार्थी अल्प गुणांमुळे पात्र ठरू शकले नसले तरी त्यांच्या प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार गटशिक्षणाधिकारी कार्यालय, सोयगाव यांच्या वतीने करण्यात आला. सोयगाव केंद्राचे केंद्रप्रमुख फिरोज तडवी यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापक दादाराव राठोड यांचे प्रतिनिधी, वर्गशिक्षक व मार्गदर्शक शिक्षक भास्कर चौधरी, संगीता सोनवणे, माजी शिक्षक पंकज रगडे, निदेशक सचिन ढगे आदी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे, विस्तार अधिकारी सचिन पाटील, केंद्रप्रमुख फिरोज तडवी, मुख्याध्यापक दादाराव राठोड, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षणप्रेमी नागरिक व पालक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुख्याध्यापक दादाराव राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भास्कर चौधरी, संगीता सोनवणे, पंकज रगडे व सचिन ढगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

फोटो : दत्तात्रय काटोले

Don`t copy text!