राज्य खो खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याच्या कुमार/मुली खो खो संघाच्या कर्णधारपदी प्रतिक सपकाळे व पायल पावरा यांची निवड…..!!!!!

राज्य खो खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याच्या कुमार/मुली खो खो संघाच्या कर्णधारपदी प्रतिक सपकाळे व पायल पावरा यांची निवड…..!!!!!

 

जळगाव (क्रीडा प्रतिनिधी) – महाराष्ट्र खो खो असोसिएशनतर्फे सन 2025-26ची कुमार/मुली या वयोगटाची 51 वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा बुऱ्हाणनगर जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न होत आहे. जळगांव जिल्ह्याचा संघ सहभागी होत असून या संघाची निवड समिती सदस्य म्हणून दत्तात्रय महाजन, दिलीप चौधरी, विशाल पाटील, स्वप्निल कोळी यांनी काम पाहिले. या संघाला संघटनेचे पदाधिकारी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, प्रा.डी. डी. बच्छाव, उदय पाटील, एन. डी. सोनवणे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव पोळ, प्रा.श्रीकृष्ण बेलोरकर, सुनिल समदाणे, राज्य सहसचिव जयांशू पोळ, सौ.विद्या कलंत्री, जिल्हा सचिव राहुल पोळ यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

कुमार/मुली संघ पुढील प्रमाणे.

 

कुमार :- प्रतिक सपकाळे (कर्णधार), कृष्णा महाजन, आर्यन पावरा, रुद्राक्ष माळी, किरण पावरा, नितिन पावरा, सुमित चौधरी, बादल पावरा, आकाश बारेला, यश गवळी, रोहित पावरा, वैभव पाटील, उज्वल महाजन, सचिन राठोड, अजय पावरा प्रशिक्षक :- दिलीप चौधरी तर व्यवस्थापक छगन मुखडे

 

मुली :- पायल पावरा (कर्णधार), लक्ष्मी पावरा,उन्नती सोनवणे, पूर्वी सोनवणे, विभा सोनवणे, हेतल पाटील, भाग्यश्री कोठी, यज्ञा पवार, पूर्वा पाटील, सोनाली घेनगट, अंतरा सराफ, कविता बारेला, दिक्षा पाडवी, मयुरी गायकवाड, जिविका पाटील प्रशिक्षक विशाल पाटील व्यवस्थापक दिपिका नंदवाळकर