Home महाराष्ट्र सासऱ्याचा खुन करून पळणाऱ्या फरारी जावयाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

सासऱ्याचा खुन करून पळणाऱ्या फरारी जावयाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

सासऱ्याचा खुन करून पळणाऱ्या फरारी जावयाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

या बाबतची घटना अशी की अहिल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी शिवारात दिनांक २२फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास मयत रामदास निवृत्ती सोनवणे (वय वर्षे ५५) राहणार, निमगाव सावा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे,याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणांमुळे गळा आवळून खून केला होता.सदर घटने संदर्भात मयताचा भाऊ तुळशिराम निवृत्ती सोनवणे (वय वर्षे ५८), राहणार, सुलतान पूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ११६/२०२६ बी.एन.एस.कलम १०२(१), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या बाबत अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कबाडी साहेब यांना गुन्हा उघडकीस आणुन संशयित आरोपीस तातडीने ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळन्याच्या सुचना दिल्या होत्या.सदर सुचनेनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कबाडी साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलीस पथक तयार करून त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, पोलिस अंमलदार अतुल लोटके,फुरकान शेख,दिपक घाटकर,रिचर्ड गायकवाड,अमृत आढाव, रमिझराजा आतार,विशाल तनपुरे,आकाश काळे,प्रशांत राठोड,चालक उत्तरेश्वर मोराळे यांचा समावेश केला होता.आणि सदर पथकास गुन्हा उघडकीस आणून आरोपीस तातडीने ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या.आणि पुढील तपासासाठी एक स्वतंत्र पोलिस पथक रवाना केले होते. सदर पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देवून घटना स्थळाची पाहणी केली आणि आरोपीचा माग काढत असताना पोलिस पथकास सदरचा गुन्हा हा मयताचा जावई अमित नारायण डुकरे व त्याचा साथीदार अमोल उत्तम डुकरे यांनी दोघांनी मिळून केला असल्याची माहिती गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली होती.सदरच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता दिनांक २५ फेब्रुवारी रोजी संशयित आरोपी नंबर १)अमित नारायण डुकरे (वय वर्षे ३४), राहणार पारगाव आळे,तालुका जुन्नर,जिल्हा पुणे आणि आरोपी नंबर २) अमोल उत्तम डुकरे (वय वर्षे ३१) राहणार औरंगपूर,तालुका जुन्नर,जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे कसुन चौकशी केली असता संशयित आरोपी अमित नारायण डुकरे यांनी सांगितले की मयत ईसम हा माझा सासरा असुन माझी पत्नी ही सुमारे एक वर्षा पासून नांदत नसुन तीला एक सव्वा वर्षाची मुलगी आहे.मयत सासरा हा सतत नेहमी वारंवार माझ्याशी वाद घालून माझी छोटी मुलगी हिला जीवे ठार मारण्याची धमकी देत असे.याचा राग अनावर झाला असल्याने संशयितआरोपी नामे अमित नारायण डुकरे यांनी त्याचा साथीदार अमोल उत्तम डुकरे याच्या मदतीने मयत सासरा रामदास निवृत्ती सोनवणे यास कार गाडी मध्ये बसवून घेऊन जाऊन त्याचा गळा आवळून खून केला आणि त्याचे प्रेत पारनेर तालुक्यातील ढवळपुरी शिवारात डोंगर दरीत फेकून दिल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली होती.पोलीसांनी दोन्ही संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना ताब्यात घेऊन पारनेर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करून गजा आड केले.सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कबाडी साहेब यांच्या पोलिस पथकाने केली आहे. पुढील तपास पारनेर पोलीस निरीक्षक साहेब करीत आहेत.”कानून के हाथ बहोत लंबे होते है” या चित्रपटातील वाक्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही.राग हा माणसाचा शत्रू आहे हे या घटनेवरून दिसून येते.

Don`t copy text!