नांद्रा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

नांद्रा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

नांद्रा(ता.पाचोरा)ता.२७ देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आप्पासाहेब पी.एस.पाटील माध्यमिक विद्यालय व जि.प.शाळा नांद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने गावात प्रभात फेरी काढण्यात आली.सर्व प्रथम ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच आशाबाई तावडे, तलाठी कार्यालयाचे ध्वजारोहण हिरालाल सुर्यवंशी,जि.प.शाळेचे ध्वजारोहण शालेय समिती उपाध्यक्ष मायाबाई मोरे, माध्यमिक विद्यालयातील ध्वजारोहण ग्रंथालय सुनिल चौधरी,तर इंग्लिश मिडीयम स्कूल चे माजी सैनिक शरद बोरसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

आला याप्रसंगी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ वाय.जी.पाटील,उपाध्यक्ष विश्वनाथ सुर्यवंशी, सरपंच आशाताई तावडे,उपसरपंच शिवाजी तावडे ग्रामपंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी, अनिल प्रकाश खैरनार, माजी सरपंच सुभाष तावडे ,आनंदा बाविस्कर, निर्मलाताई पिंपळे,विनोद तावडे,पोलीस पाटील किरण तावडे ,प्रा.यशवंत पवार, पत्रकार राजेंद्र पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष बाविस्कर ग्रामसेविका अनिता सपकाळे,हिरालाल सूर्यवंशी, स्वप्निल बाविस्कर,मेघराज सूर्यवंशी,ओम पवार,किरण सोनार,गणेश सूर्यवंशी,अनिल बोरसे, संजय पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक आर. एस .चौधरी ,अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा सेविका सुनिता पाटील, दिपाली पाटील, प्रतिभा सोनवने, यासह ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते . सर्व विद्यार्थींना सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील यांनी सर्व विद्यार्थींना पारले जी बिस्कीट पाकीट खाऊ म्हणून वाटप केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.ए.पाटील, यांनी तर आभार एस.व्ही.शिंदे यांनी केले यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका आर.एस.चौधरी, जि.प.शाळेच्या मुख्याध्यापीका मोहिनी पाटील, प्रतिभा पाटील, माध्यमिक चे अविनाश निकम,एस.आर.निकम,पी.एस.चौधरी, श्रीमती व्हि.एस.पाटील, गजानन ठाकूर,आर.आर.बाविस्कर यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.