पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी जामनेर तालुक्यातील पूरग्रस्त भागातील थेट शेतीच्या बांधावर जाऊन केली

पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी जामनेर तालुक्यातील पूरग्रस्त भागातील थेट शेतीच्या बांधावर जाऊन केली पाहणी.शेतकरी बांधव यांनी व्यथा मांडत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी साधला संवाद.लवकरात लवकर सरकारी मदत मिळण्यासाठी शासन दरबारी मागणी करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले मदतीचे आश्वासन.

जामनेर (प्रतिनिधी)

जामनेर तालुक्यात ७ सप्टेंबर २०२१ रोजी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व चक्रीवादळ आल्याने शेतकरी बांधव यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने अतोनात नुकसान झाले होते.

जामनेर तालुक्यातील ओझर, हिंगने, सामरोद, टाकळी व इतर भागात मोठ्या प्रमाणावर शेतीचे व पिकांचे नुकसान झाले आहे.सरकारी यंत्रणा यांनी पाहणी करून अहवाल दिल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जामनेर तालुक्यातील पूरग्रस्त भागातील पाहणी करत असताना शेतकरी बांधव यांनी झालेल्या नुकसानीचा व्यथा मांडत असताना अश्रू अनावर झाले होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जामनेर, ओझर, हिंगणे, तोंडापुर, भारुडखेडा, पाळधी येथे भेट देत शेतकरी बांधव यांच्या व्यथा जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला.तसेच लवकरात लवकर पंचनामे करून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाहणी दरम्यान जामनेर तालुक्यातील आ गिरीश महाजन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनोहर पाटील, राष्ट्रवादीचे नेते संजय गरूड, काँग्रेसचे नेते शंकर राजपूत, युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजित पाटील, तहसीलदार अरुण शेवाळे, नायब तहसिलदार प्रशांत निंबोळकर, बिडिओ कवडदेवी, शिवसेनेचे अतुल सोनवणे, सुधाकर सराफ, नीलकंठ पाटील, भरत पवार, काँग्रेसचे शरद पाटील, पुंडलिक पाटील, जामनेर पि आय किरण शिंदे, पहूर पी आय अरुण धनवडे, तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.