पाचोरा शहरात ओमायक्रॉन आजाराचा फैलाव होवु नये म्हणुन आनंदमेला हा तात्काळ बंद करा हरिभाऊ तुकाराम पाटील

पाचोरा शहरात ओमायक्रॉन आजाराचा फैलाव होवु नये म्हणुन पाचोरा शहरात आज रोजी सुरू असलेला आनंदमेला हा तात्काळ बंद करून तालुकावासियांच्या जिवाची काळजी पोलिस प्रशासनाने तसेच महसुल प्रशासनाने घ्यावी देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात थैमान घालत असलेल्या संसर्गजन्य ओमायक्रॉन आजाराचा विचार डोळ्यासमोर ठेवुन शहरात व तालुक्यात कोठे ही मोठी गर्दी जमा होणार नाही याची दक्षता पोलिस/महसूल प्रशासनाने घेण्याची वेळ आली आहे त्यातच पाचोरा शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होण्यास शासकीय परवानगी दिलेला आनंदमेला हा तात्काळ बंद करून त्याची परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी
अशी लोकहितार्थ मागणी बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य,पाचोरा यांचे तर्फे करण्यात येत आहे
आपला

श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील
संस्थापक अध्यक्ष
बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, पाचोरा