निर्मल इंटरनॅशनल स्कूल ची 100 % निकालाची परंपरा कायम

निर्मल इंटरनॅशनल स्कूल ची 100 % निकालाची परंपरा कायम…!

 

पाचोरा:- निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इ.10 वी व इ. 12 वी मध्ये 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सन 2023- 24 सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेच्यात मानचा तुरा रोवला आहे.

इ.12 वी मध्ये कु.किर्तीराज नंदलाल देशमुख यांनी 95.40% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

इ. 10 वी मध्ये कु.कुणाल सुनील पाटील यांनी 96.80 % गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. कु.ईश्वरी सुनील पाटील 96.60 % गुण मिळवून द्वितीय तर कु.ईशान दीपक हिरे 96.20% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ. वैशाली सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक स्नेहल पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.