श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दि. 23 जुलै रोजी गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मा.नानासो.श्री.संजय वाघ, व्हाईस चेअरमन मा. नानासाहेब श्री.व्ही.टी. जोशी, ज्येष्ठ संचालक मा.आप्पासो.श्री. सतीश चौधरी, मा.श्री. मयूर सराफ, मा. श्री.योगेश जडे, मा.डॉ. स्वप्नील पाटील, मा. डॉ.रुपेश पाटील, मा.डॉ. नरेश गवांदे, विजय कापड दुकान चे संचालक मा. श्री. अनुराग भारतीया, नेरी वाला ड्रेसेस चे संचालक मा.श्री रवी अग्रवाल, दर्शन एम्पोरियम चे संचालक मा.श्री ओम राठी, पी.सी. जैन चे संचालक मा.श्री.विजयकुमार बडोला, शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर.ठाकरे सर, उप मुख्याध्यापक श्री. आर.एल. पाटील सर, पर्यवेक्षिका सौ.ए.आर.गोहिल मॅडम, श्री .आर. बी. तडवी सर, श्री.आर.बी.बांठीया सर, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री.मनीष बाविस्कर सर, तांत्रिक विभाग प्रमुख श्री. एस. एन.पाटील सर कार्यालयीन प्रमुख श्री. अजय सिनकर, पालक इतर शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
. सर्वप्रथम वरील सर्व मान्यवरांचा
मुख्याध्यापक व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बुके देऊन स्वागत करण्यात आले.
शाळेतील जवळपास 200 अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.
ज्या मान्यवरांनी गणवेशासाठी सढळ हस्ते मदत केली त्या सर्वांचे शाळेच्या वतीने ऋण व्यक्त केले गेले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.आर. बी. बोरसे सर यांनी केले.