अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या चेरमन पदी चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड, कींगमेकर पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा पडद्या मागिल करीष्मा

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) भाजपचे दिवंगत नेते माजी मंत्री स्व.शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या अकाली निधनामुळे रीक्त झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या चेरमन पदाच्या जागेवर आता माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.कींगमेकर म्हणून पडद्या मागून गुप्त हालचाली करून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. गेल्यावेळी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांना एका मताने पराभूत करून त्यांच्या जागेवर स्व.शिवाजीराव कर्डिले साहेब यांची निवड करण्यात आली होती.त्या निवडीत ही विखे पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.चंद्रशेखर घुले पाटील हे बॅंकेच्या निवडणुकीत एका मताने पराभूत झाल्या नंतरही त्यांनी आमदारकी ची निवडणूक लढविली होती परंतु त्यांना त्यामध्ये पराभवास सामोरे जावे लागले होते. तेव्हा पासून ते एकाकी पडले होते.लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणा मिमांसा करत दुधाने पोळलेल्या विखे पाटील यांनी आता पासूनच ताकही फुंकून प्यायला सुरुवात केली आहे. चंद्रशेखर घुले पाटील हे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे म्हणून ओळखले जातात. शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुर्ण पणे बदलल्याची चिन्हे या निमित्ताने दिसत आहेत.दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सहकारी बँकेच्या पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सभागृहात झालेल्या जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळांची बैठक पार पडली.त्या बैठकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.आणि त्यांच्या निवडीचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता अहिल्यानगर मधिल राजपॅलेस या ठिकाणी सर्व संचालक मंडळांची चहापानाच्या नावाखाली अनौपचारिक बैठक पार पडली.तेथेच सर्व संचालक मंडळाकडून घुले पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता.जिल्हा सहकारी बँकेच्या चेरमन पदाच्या निवडणुकीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडद्या मागून गुप्त हालचाली करून ही चेरमन पदाची माळ घुले पाटील यांच्या गळ्यात घालण्यात चोख भुमिका बजावली आहे.या चेरमन पदाच्या निवडणुकीच्या वेळी माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील,गणपतराव सांगळे,करण ससाणे,अमित भांगरे, प्रशांत गायकवाड, राहुल जगताप, आशुतोष काळे,अरूण तनपूरे,माधवराव कानवडे,भानुदास मुरकुटे,सिताराम गायकर,अंबादास पिसाळ,अमोल राळेभात,अण्णा साहेब शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे,आशाताई तापकीर , अनुराधा नागवडे,गितांजली शेळके,आणि चंद्रशेखर घुले हे एकूण १९ संचालक उपस्थित होते.माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच त्यांनी सर्व संचालक मंडळांचे आभार मानले.त्यांच्या समर्थकांनी संपूर्ण जिल्ह्यात फटाके फोडून आनंद व्यक्त केला.लोकसभा निवडणुकीत पडद्या मागून गुप्त हालचाली करून विखे पाटील यांना अप्रत्यक्ष रीत्या केलेल्या मदतीची तर ही उतराई नाही ना अशी शंका जिल्ह्यात व्यक्त करण्यात येत आहे.पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घुले पाटील यांच्या निवडीनंतर केलेला जाहीर सन्मान बरेच काही सांगून जातो.नामदार विखे पाटील हे खरोखरच किंग मेकर ठरले आहेत.हे या निवडीवरून दिसून येते.
























