द अ‍ॅकॅडमी स्कूलचा (TAS) नवा लोगो सादर : हरित आणि शाश्वत शिक्षणाकडे वाटचाल

द अ‍ॅकॅडमी स्कूलचा (TAS) नवा लोगो सादर : हरित आणि शाश्वत शिक्षणाकडे वाटचाल

– TAS ने नवीन शैक्षणिक वर्षात पर्यावरणाप्रती आपली बांधिलकी केली स्पष्ट

 

प्रतिनिधी,

 

पुण्यातील द अ‍ॅकॅडमी स्कूल (TAS) ने त्यांच्या ब्रँड लोगोमध्ये निळ्या रंगाऐवजी मृदू हिरव्या रंगाचा बदल करत, पर्यावरणाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. नव्याने सादर करण्यात आलेला लोगोमध्ये वृद्धी, जबाबदारी, शाश्वतता आणि सर्वांगीण शिक्षण यांचे प्रतीक आहे. ही ओळख केवळ दृश्यात्मक नसून, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण-जागरुकता निर्माण करण्याची आणि संतुलित, पोषणकारक शिक्षण देण्याची संस्थेची कटिबद्धताही दर्शवते.

 

हिरवा रंग का?

 

शाश्वतता आणि जबाबदारी:हिरवा रंग TAS च्या पर्यावरणपूरक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण-जाणिव आणि जबाबदारीची भावना निर्माण करणे, हे या परिवर्तनामागील मुख्य उद्दिष्ट आहे. भविष्यात जिथे शाश्वतता अत्यावश्यक ठरेल, त्यासाठी विद्यार्थ्यांना सज्ज करणे हे संस्थेचे ध्येय आहे.

 

*वाढ आणि पुनरुज्जीवन:* जसा निसर्ग सतत फुलत आणि विकसित होत असतो, तसाच TAS चा प्रत्येक विद्यार्थीही वैयक्तिक आणि बौद्धिकदृष्ट्या प्रगती करतो. हिरवा रंग ही सातत्याने होणाऱ्या शिकवणीची, आत्मविकासाची आणि नवनिर्मितीचे प्रतीक आहे.

 

सामंजस्य आणि कल्याण:हिरवळ असलेले शांत व सौंदर्यपूर्ण वातावरण विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हितकारक ठरते. असे वातावरण प्रेरणा, सकारात्मकता आणि समतोल विकासास चालना देते.

 

*ध्येयाशी सुसंगत भविष्य:* हिरव्या रंगाची निवड ही TAS च्या शिक्षण व निसर्ग यांचा समन्वय साधणाऱ्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. ही निवड अशा पिढीचे घडवणारे आहे जी केवळ बुद्धिमानच नव्हे, तर पर्यावरणप्रेमी आणि जबाबदार नागरिक देखील असेल.

 

TAS चे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी नवीन लोगोचे मनापासून स्वागत केले असून, ते एक उज्वल आणि हरित भविष्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. “आमचा विश्वास आहे की, शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून, ते जबाबदार, सजग आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व घडवण्याचे माध्यम आहे,” असे TASच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैथिली तांबे यांनी सांगितले. “आमचा नवीन लोगो हा शाश्वतता, वृद्धी आणि सर्वांगीण विकास यांना प्राधान्य देणाऱ्या शिक्षणपद्धतीची साक्ष आहे. हा लोगो नवकल्पना, प्रगती आणि उद्देशपूर्ण शिक्षणाची दिशा दर्शवतो,” असेही त्यांनी नमूद केले.