लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार,पण आज खरी पत्रकारिता धोक्यात आली आहे
🖋️ सन १९९६ सालापासून पत्रकार म्हणून काम करताना पदरात अनेक बरेवाईट अनुभव आले.काही गद्दार तर काही यादगार निघाले.सत्य लिहिल म्हणून वेळ प्रसंगी दोन हात करण्याची सुद्धा वेळ आली होती.पत्रकार हा केवळ बातमी लिहिणारा नव्हे, तर लोकशाहीचा जिवंत आत्मा आहे.गल्लीतील ग्रामपंचायत सभागृहात काय घडते आणि दिल्लीच्या लोकसभेत नेमके कोणते निर्णय होतात,गावात गावगुंड्या करून कोण न्याय करतो आणि कोण सर्व सामान्य लोकावर अंन्याय करतो. हे पहात असताना सर्व सामान्य जनता आणि सरकार यांच्या मध्ये दुवा साधण्याचं काम पत्रकार करीत असतात. पत्रकारीता ही निरपेक्ष असली पाहिजे. पत्रकाराला कोणत्याही निवडणुकीत एका पक्षाची भूमिका घेऊन निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहता येत नाही.परंतु आज अनेक महाभाग पत्रकारितेची नितीमुल्ये सर्रास पायदळी तुडवून खुलेआम पणाणे एका पक्षाची हुजरेगिरी करत निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहत आहेत.आणि आपली खालावलेली पत प्रतिष्ठा पणाला लावत आहेत ही उघड उघड पत्रकारितेची गळचेपी होत आहे.यामुळे पत्रकारीतेची नितिमुल्ये पायदळी तुडवली जात आहेत.
पत्रकाराने सद विवेक बुद्धीने नेहमी चांगल्या कामाचे समर्थन केले पाहिजे आणि वाईट गोष्टी वर व चुकीच्या निर्णयांवर कठोर प्रहार केला पाहिजे.पण आज राजकीय पक्षाची लाचारी पत्करलेल्या पत्रकार लोकात टीका करण्याचेही धाडस राहीले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
आज जर पत्रकार गप्प झाला
तर भ्रष्टाचारी लोक देश विकून खातील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पत्रकाराने आपल्या कर्तृत्वात कसुर केली तर सगळीकडे अराजकता माजेल,
अन्याय वाढेल,
सत्तेच्या मस्तीत मनमानी होईल
आणि सर्व सामान्य जनतेला कोणीही वाली राहणार नाही. जनतेचा आवाज दबला जाईल.
पत्रकाराची लेखणी ही दुधारी तलवारी सारखी असली पाहिजे. कारण हाताने केलेल्या वारा पेक्षा लेखणीचा वार हा दुधारी तलवारी पेक्षाही जास्त तीक्ष्ण असतो.पण तो लेखणीचा वार हा लोक हितासाठी आणि लोकांसमोर सत्य मांडण्यासाठी साठी असला पाहिजे.केवळ खुनशी पणा,बदला घेण्यासाठीची सुडबुद्धी, पक्षपाती पणा किंवा जाहीराती साठीच्या तळवे चाटूपणाच्या स्वार्थासाठी नसला पाहिजे.
पत्रकार सत्तेचा गुलाम नसतो, तर तो जनतेचा सेवक असतो. सामाजिक बांधिलकी म्हणून काम केले पाहिजे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून घेण्यासाठी आपली पत्रकारिता लायक असली पाहिजे.
केवळ फक्त लोकांच्या चुकावर लक्ष ठेवून टीका करताना आपले पत्रकारितेचे आचरण निटनेटके असले पाहिजे. कोणीही चूक केली तर त्याला त्याच्या चुका दाखवून ब्लॅक मेल करणारा पत्रकार असता कामा नये.परंतु आज ब्लॅक मेल करणाऱ्या पत्रकारांचा गल्ली बोळात सुळसुळाट झाला आहे.अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले व स्वतःला पत्रकार म्हणून मिरवून घेणारे अनेक महाभाग पत्रकार हे डॉक्टरी पेशातील लोकांना लुबाडताना दिसतात.म्हणून पत्रकारीता हे क्षेत्र काही निवडक दळभद्री लोकांमुळे बदनाम होउ पहात आहे.
म्हणूनच आजची पत्रकारिता ही निरपेक्ष,निर्भीड आणि निडर असली पाहिजे.पण तसं होताना दिसत नाही.आजच्या काळात अनेक गुंडांचे दबाव, आमिष,धमक्या, गलीच्छ राजकारण यांमुळे पत्रकारितेचा दर्जा घसरत चालला आहे.काही बांडगूळी लोकांच्या मतलबी प्रवृत्ती मुळे आजच्या पत्रकारीतेवर प्रश्नचिन्ह उभे राहताना दिसत आहे.आज
खरी पत्रकारिता ही कुठेही पहायला मिळत नाही.
जी पत्रकारिता सत्यासाठी रणांगणात उतरून निर्भिडपणे सरकार दरबारी
जनतेचा आवाज बनते.व लोकांचे अधिकार,हक्क आणि कर्तव्ये,व सत्यरुपी
न्यायासाठी सतत मैदानात लढत उभी राहते ती खरी पत्रकारिता असते.काही लबाड पत्रकार हे पुरस्कार विकत घेऊन आपल्याच टीरी बडवून घेत आहेत.त्यांच्या अक्कल हुषारीची कीव करावी तेवढी थोडीच आहे.
पत्रकाराची भूमिका ही संदिग्ध न राहता एखाद्या पक्षाची नाही तर निरपेक्ष पणे सत्याची जाणीव निर्माण करणारी असली पाहिजे. पत्रकार हा कोणाचाही
विरोधक किंवा समर्थक नसला पाहिजे.तो फक्त सत्याचा प्रकाश निर्माण करणारा चकाकता तारा असला पाहिजे. वर वर चमकत झलक मारणाऱ्या विकासाच्या फलकांमागे जर खोल अंधार दडला असेल तर तो उजेडात आणून दाखवणे ही रास्त भूमिका जबाबदार पत्रकाराची असली पाहिजे.
खरोखर अतिशय सुंदर काम झाले असेल तर ते जनतेपर्यंत प्रकाशित करण्याची मुख्य जबाबदारी ही पत्रकाराची असली पाहिजे.
पत्रकारिता करताना समाजात चांगल्या वाईट घडामोडींवर प्रहार करून लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे.
पत्रकारिता करणं म्हणजे केवळ टीका करणे असे नाही तर सत्याचा शोध घेत घेत
पत्रकारिता केली पाहिजे.काही लोक फक्त द्वेष निर्माण करत लोकांना वेठीस धरून आपला कार्यभाग साधून पत्रकारितेला बदनाम करू पहात आहेत ते अत्यंत चुकीचे आहे.आज काल समाजात
जोपर्यंत निरपेक्ष पत्रकार आहेत, तोपर्यंतच लोकशाही बळकट झालेली दिसेल.
आजच्या शोशल मिडियाच्या जमाण्यात खऱ्या पत्रकारांनी स्वतः सत्य मांडण्याचे धाडस ठेवले पाहिजे,
आणि समाजाने ही पत्रकारांना प्रोत्साहन देत त्यांचा सन्मान केला
तरच देशातील सर्व सामान्य जनता आणि सरकार दोघांचे हक्क आणि कर्तव्ये सुरक्षित व अबाधित राहतील.आजच्या पत्रकारांनी जाहिरातीसाठी भ्रष्ट पुढाऱ्यांच्या पायावर लोटांगण न घालता समाज मनाचे प्रतिबिंब दाखवणारी
सत्य पत्रकारिता करणं आवश्यक आहे.दिनांक 23 नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस होता.आज धकाधकीच्या जीवनात सामाजातील पत्रकारीतेचे नितीमुल्ये जपणाऱ्या अनेक कर्तव्यदक्ष घटकातील सर्व सामान्य व्यक्ती, राजकीय नेते, जनतेचे समाज सेवक,कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी, आजी माजी सरपंच,माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी मोबाईल वर प्रत्यक्ष बॅनर लावून हाॅटसाॅपच्या, फेसबुकच्या माध्यमातून प्रत्यक्ष फोन करून ज्या प्रेमळपणाणे सुबेच्छा दिल्या आणि माझ्या वर जो सुबेच्छांचा वर्षाव करीत विश्वास व्यक्त केला त्या सर्वांचा मी अंतःकरण पूर्वक ऋणी राहीन.तुमच्या सुबेच्छा मुळे मला पत्रकारीता करण्यासाठी अजून ही चांगले बळ मिळाले आहे.मी आयुष्यात जर काही कमावलं असेल तर ते माझं हीत जोपासनारी, सुबेच्छा देणारी तुमच्या सारखी गोड आणि प्रेमळ माणसं या सर्वांचे जाहीर आभार. सुबेच्छांचा वर्षाव करणारे लक्षात राहिलेले हितचिंतक पुढील प्रमाणे ——– जवखेडे खालसा ग्रामपंचायत सदस्य अमोल मतकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव,ह.भ.प. भागवत महाराज मरकड,रासपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष अंकुशराव बोके,शरद म्हस्के, युवा नेते संदिप राजळे यांनी प्रत्यक्ष सुबेच्छांचे बोर्ड बनवून सुबेच्छा दिल्या त्यांचे प्रथम मन:पुर्वक आभार मानतो. मातोश्री लॅबोरेटरी चे डॉक्टर विठ्ठलराव गायकवाड,अप्पासाहेब मंचरे, केदारेश्वर कारखान्याचे मा.व्हा चेरमन सुरेशचंद्र होळकर,पत्रकार अशोक मंडलीक, दिपक धनवटे, वसंतराव नेहुल, संभाजी काजळे,उमेश आव्हाड,रामदास नजन,कोपरे येथील माजी सरपंच रमेश आव्हाड, मारूतराव घुले पाटील,गोपिनाथ माळी, विनोद काजळे,नितीन आव्हाड,पत्रकार अमोलराजे म्हस्के, बद्रीनाथ धोंडे, विष्णू नेहुल, शिवाजी दवणे, प्रविण खंबायत, अरुणदेवा पुंड, सर्जेराव लाटे, नवनाथ तिजोरे,प्रतिक आव्हाड, देविदास नागरगोजे,दिगू वांढेकर,ज्ञानेश्वर आंधळे, प्राध्यापक उत्तमराव राजळे, महेश उघडे, बाबासाहेब खंडागळे,चव्हाण सर,योसेफ शिरसाठ मेजर, एकनाथ नाना वाडगे,पत्रकार अक्षय वायकर, मेजर प्रकाश राजळे,तुकाराम ढाकणे,अनिल कुलकर्णी, अप्पासाहेब वीर,शाम सर, सखाराम खिलारी,राहुल कांबळे,पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब अकोलकर,दुसरे माजी सभापती संभाजीराव पालवे,होम,महेश शिंदे,अजित नेहुल,उद्धवराव मतकर,स्टेट बँक युनिटचे संचालक रविंद्र बेरड,राहुल बाबर सर, बाबासाहेब नजन, कैलास अकोलकर, वृक्षमीत्र सुखदेव म्हस्के,शहाजी कोरडकर, ग्रामपंचायत सदस्य संभाजी राजळे, अप्पासाहेब राजळे,गणेश लहुटे,उमेश तिजोरे सर, श्रीकांत माणिकराव भगत पाटील,पत्रकार जनार्दन बोडखे सर,ग्रामसेवक सुधिर शेळके, संतोष तिजोरे, म्हातारदेव शेळके, विष्णू जमधडे, सुधाकर भिसे, देविदास वाकडे, रामकिसन आंधळे, बाळासाहेब सुनिल आव्हाड,खाडे ए.एम.,बाबुराव बांगर,पत्रकार अनिल खाटेर, सदानंद बारसे, पोलिस कॉन्स्टेबल हारुन शेख,डॉ.अनिल भगत,अनिल तिजोरे सर, विकास तुपे, भाऊसाहेब शेळके दुकानदार, हरीभाऊ खोजे, संतोष शिरसाठ,बी.के. पवार,एम व्ही कनगरे, बाळासाहेब पगारे, मारुती लवांडे, आव्हाने येथील गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी, काॅं.बापुराव राशिनकर,वसंत देवकर, बाबासाहेब राशिनकर, हरीदास कोळेकर, देविदास वाकडे, राजेंद्र भाऊ, कावेरी भाकरे, आष्टीचे माजी सभापती अशोक ढवण,डॉक्टर मुकुंदराव राजळे, महादेव महाराज घुगे,एस एस एम, पोलिस मीत्र फिरोज पठाण, दत्तात्रय कोरडे, कानिफनाथ कर्डिले,देविदास फटांगडे,अक्षय मोरे,परमेश्वर मतकर,शामलाल जाधव,जगताप फिटर,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, ग्रामसेवक नारायण नजन, बाळासाहेब गायकवाड, शिवाजी गायकवाड, नवनाथ बळीद, जवखेडे सेतू, हरीशचंद्र आव्हाड,शहादेव खोसे पाटील, हर्षल मतकर,देवा पालवे,संदिप म्हस्के सर,शिरिष साखरे दुकानदार,नामदेव संभाजी राजळे, अशोकराव ढगे, रावसाहेब नवगिरे,एस एम घुले,सुभाष दिवटे महाराज,शहादेव मामा गुंजाळ, पत्रकार वजीर शेख,अनिल मिसाळ,मच्छिंद्र ढाकणे,पत्रकार अविनाश मंत्री, प्रमोद वाळके, अन्सार सलीम शेख,डॉ पांडुरंग गाडे,नानासाहेब चांगुलपाई, राधाकिसन कासार सर, वसंतराव वाघमारे, युवा नेते भारत मतकर, राजेंद्र मतकर सर, जवखेडे सरपंच चारुदत्त वाघ, जहांगीर शेख, माजी चेरमन बाबासाहेब बर्डे, म्हातारदेव आठरे वकील,वर्गमीत्र आझाद इस्माईल शेख,नंदू लोखंडे सर,देवराम खेडेकर,संतोष गुंजाळ,वाघोली सोसायटीचे विद्यमान संचालक पांडुरंग दातीर, चितळीचे सरपंच अशोकराव आमटे,शाहीर बाळासाहेब काळपुंड,शेतकरी संघटनेचे बाळासाहेब गर्जे, तिसगावचे युवा नेते रफिक शेख,पिंटू तोगे, रामेश्वर शिरसाठ,पप्पू जाधव,डॉक्टर दिनेश बटुळे, तुषार तुपे गुरूजी, गोरक्षनाथ दातीर सर,राजू मामा तागड,ज्ञानदेव वीर,ॲडव्होकेट आसिफ लतिफ शेख,अर्जुनराव बुधवंत, शिवाजीराव वाघमारे सर, पत्रकार दौलत झावरे, विजय कोरडे,पत्रकार कैलास ढोले,फुरकान हसन,चाॅंद मनियार,राजेंद्र साखरे,सुनिल पाटेकर,विनोद दगडखैर, मा.सरपंच बापुसाहेब गोरे, गणेश भालसिंग, प्रदिप पाटील, गजानन विधाते, निलेश गारदे, भगवान वाघमारे, एकनाथ जगताप, पत्रकार सुरेश विधाते,मयुर मुनोत,मुरली नजन,दत्तात्रय पवार,नामदेव खंडागळे गुरूजी, देविदास कासार, दादासाहेब मरकड या मांन्यवर प्रमुखांचे व लक्षात राहिलेल्या ज्ञात आणि अज्ञात हितचिंतकांनी ज्या सुबेच्छा दिल्या त्या बद्दल त्यांचेही जाहीर आभार आणि ऋण निर्देश. आपला सहकारी (पत्रकार सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा).

























