डॉक्टरांनी भर रस्त्यात वाचवले रुग्णाचे प्राण.. आंबेवडगावचे डॉ. झेरवाल ठरले देवदूत 

डॉक्टरांनी भर रस्त्यात वाचवले रुग्णाचे प्राण.. आंबेवडगावचे डॉ. झेरवाल ठरले देवदूत

 

 

आंबेवडगाव तापाचोरा

आंबेवडगाव गावाच्या जवळ भर दुपारी एका मोटरसायकल स्वार रस्त्याच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याच्यासोबत त्यांची पत्नी त्याचा घाम पुसूत मदतीची हाक लावत होती.

 

याच रस्त्याने पाचोरा कडून आंबेवडगाव कडे जाणारे डॉ झेरवाल ही त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी तात्काळ परिस्थिती लक्षात घेता प्रथमोपचार केले. रस्त्यावरती रहदारीने जमलेल्या लोकांनी डॉक्टरांची प्रशंसा केली व डॉक्टर देवदूत म्हणून आले असल्याची चर्चा केली. भर रस्त्यावर जागेवरती जाऊन उपचार करून देखील डॉक्टरांनी नाममात्र दीडशे रुपये फी घेतली.