पाचोरा येथे आ.किशोर दराडे यांचे हस्ते संगणक आणि प्रिंटर वाटप

पाचोरा येथे आ.किशोर दराडे यांचे हस्ते संगणक आणि प्रिंटर वाटप

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
पाचोरा-(प्रतिनिधी )
नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी येथील श्री.गो.से. हायस्कूल येथे तालुक्यातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांची बैठक घेत विविध शाळांना ३० संगणक आणि ११ प्रिंटर वाटप केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ यांनी किशोर दराडे यांचे कार्यालयात स्वागत केले तर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीला तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.यावेळी संजय वाघ यांनी आमदार किशोर दराडे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला तर संभाजी पाटील यांनी गेल्या साडेचार वर्षात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी शिक्षकांसाठी केलेल्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून घेतला.यावेळी त्यांनी आमदार किशोर दराडे यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात झालेल्या कार्याची शिक्षकांना माहिती करून दिली. तसेच टप्पा अनुदान, जुनी पेन्शन, थकीत वेतन मिळणे, अंशतः अनुदानित अशा विविध शिक्षकांच्या समस्या आणि त्यासाठी आमदारांनी केलेले प्रयत्न याबद्दल मत मांडले.
यावेळी शालेय समिती चेअरमन खलिल देशमुख यांनी संस्थेतर्फे मनोगत व्यक्त करून आमदारांचे आभार मानले तर आमदार किशोर दराडे यांनी शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांमधील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले तर भविष्यात देखील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण बांधील असल्याचे सांगितले तर शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच टप्पा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल शिक्षकांना विश्वास दिला.
यावेळी व्यासपीठावर तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी, पिके शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक गीते सर , तुळजाई शिक्षण संस्थेचे कृष्णापुरी विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण पाटील,माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक भावेश अहिरराव, शांताराम चौधरी यांचेसह उपमुख्याध्यापक एन .आर.पाटील, पर्यवेक्षक आर एल पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एस पाटील यांनी केले तर आभार उज्वल पाटील यांनी मानले.