सामाजिक कार्यकर्ते आनंदा बाविस्कर यांच्या सामाजिक कार्याची दखल नांद्रा येथील संकल्प फांउडेशन व ग्रामपंचायत कडून गौरव

सामाजिक कार्यकर्ते आनंदा बाविस्कर यांच्या सामाजिक कार्याची दखल
नांद्रा येथील संकल्प फांउडेशन व ग्रामपंचायत कडून गौरव

नांद्रा(ता.पाचोरा)ता.11 येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदा (पेंटर)बाविस्कर हे अनेक वर्षांपासून गोर गरिब लोकांच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र झटत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेत येथील संकल्प फाँउडेशन व नांद्रा ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान सोहळा संपन्न झाला.त्याच बरोबर गावात नव्याने पाणी पुरवठा ची जबाबदारी सांभाळून तीन ते चार दिवसात गावात पाणी पुरवठा करणारे कर्मचारी संजय बोरसे यांचा हि संन्मान करण्यात आला.यावेळी सरपंच आशा ताई तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत सदस्य तथा संकल्प फाँउडेशन चे किशोर पाटील,सामाजिक कार्यकर्ते विनोद तावडे, ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी, बंटी सुर्यवंशी, भाऊसाहेब बाविस्कर,,निर्मला पिंपडे, दिलीप सोनवणे, ग्रामविकास अधिकारी अनिता सपकाळे, क्लार्क जगदीश बाविस्कर, दिलीप तावडे,यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो…………….. नांद्रा (ता.पाचोरा) संकल्प फाँउडेशन व ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आनंदा बाविस्कर, पाणी पुरवठा कर्मचारी संजय बोरसे यांचा संन्मान करतांना सरपंच आशा ताई तावडे, किशोर पाटील, शिवाजी तावडे, विनोद तावडे, ग्रामविकास अधिकारी अनिता सपकाळे आदी.