मुळा धरणाच्या पाण्यासाठी दिडशे वॅटचे सोलर आम्ही मंजूर करतोय,आता तुमच्या वांबोरी चारीला कोणतेही बील भरावे लागणार नाही याची आम्ही कायम व्यवस्था करतो : ना.राधाकृष्ण विखे पाटील

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) मुळा धरणाच्या पाण्यासाठी दिडशे वॅटचे सोलर आम्ही मंजूर करतोय आता तुमच्या वांबोरी चारीला कोणतेही बील भरावे लागणार नाही याची आम्ही कायम व्यवस्था करतो अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ते अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे मुळा उच्च स्तरीय उजव्या कालव्याच्या (वांबोरी चारी टप्पा क्रमांक एक) स्थापत्य यांत्रिकी व विद्युत घटकांची दुरूस्ती साठी १४कोटी १५ लाख रुपये किंमतीच्या कामाचा भुमीपुजन समारंभ नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे,नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे, अक्षय कर्डिले हे होते.ना. विखे पाटील पुढे म्हणाले की पुढील वर्षी उपलब्ध असलेल्या धरणातील पाण्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे.पाण्याची बचत करता आली पाहिजे.ज्या भागात पाण्याची मागणी आहे त्यांना आपल्याला मागणी प्रमाणे पाणी देता आले पाहिजे.या चारी मुळे स्व.बाळासाहेब विखे पाटील आणि स्व.गोपिनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार होत आहे. या पेक्षा कोणत भाग्य असु शकते.स्व. बाळासाहेब विखे पाटील हे केंद्रात मंत्री असताना वांबोरी चारी साठी शंभर कोटी मंजूर केले होते हे किती लोांना माहिती आहे असे नामदार विखे पाटील म्हणाले.मीरी करंजी गटात फक्त २४२२ शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी २६ लाख रुपये जमा झाले आहेत.आम्ही१६०कोटीची मागणी केली आहे.एकूण २५३ कोटी रुपये पाथर्डी तालुक्याला मिळाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी प्रथमच राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील ३९ गावातील कार्यकर्त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला.ना. विखेपाटील म्हणाले की लोकसभेला ३९ गावात किती मतदान झाले याची आकडेवारी मी मागवून घेतली आहे.पण मी याची वाच्यता करीत नाही.खोट बोलनारावर मोहोटादेवीचा कोप होणारच आहे.देवी भक्कम आहे अशा सगळ्या नालायक लोकांचा बंदोबस्त करायला.ज्यांनी गद्दारी केली,भामटेगीरी केली,ज्यांनी आईशी प्रतारणा केली त्यांना मोहोटादेवी निश्चितच शिक्षा केल्या शिवाय राहणार नाही.माझी डॉ सुजयला वीनंती आहे की ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या आता आपण कितीही बोललो तरीही ज्यांना भामटे पणा करायचा ते करणारच त्यांच्या रक्तातच तो गुण आहे.सन १९९१ साली वांबोरी चारी साठी स्व.बाळासाहेब विखे पाटील आणि स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या पुढाकाराने आंदोलन केले त्यावेळी राज्याचे जानते राजे(शरद पवार) यांचे हेलिकॉप्टर या राधाकृष्ण विखे यांनी लोटून दिले होते ते यांना माहिती नाही यांच्या समोर भाषण करून काय करणार आहे असे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले की वांबोरी चारी टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोन या योजनेचे नाव स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब वांबोरी चारी टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोन असे नामकरण व्हावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा करणार आहे.कारण शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नामुळे ही योजना पूर्ण होत आहे.त्यांचे नाव या चारीला द्यावे ही सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे.प्रारंभी नामदार महोदयांनी स्व.शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन त्यांना पुष्पांजली अर्पण केली.या मुळ योजनेचं प्रास्ताविक कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले.खांडगाव चे नेते वांढेकर,बंडू पाठक,महादेव कुटे,महेश अंगारखे,सुनिल साखरे,अनिल गीते,वैभव खलाटे,पुरुषोत्तम आठरे,मीरीचे माजी सरपंच संतोष शिंदे,नेते एकनाथ आटकर, संभाजीराव पालवे,कुशल भापसे,काशिनाथ पाटील लवांडे, वैभव ढाकणे, आमदार मोनिकाताई राजळे,अक्षय कर्डिले,सुजय विखे पाटील, यांनी आपले विचार व्यक्त केले.आमदार संग्राम जगताप यांनी बोलण्याचे टाळले.यावेळी मिर्झा मनियार,चारूदत वाघ,संभाजी वाघ,अण्णा शिंदे, विजय कोरडे, राजू मामा तागड यांच्या सह पंचक्रोशीतील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार शिवाजीराव पालवे यांनी मानले.या निर्धार मेळाव्या नंतर नियोजित ठिकाणी कोल्हार -शिराळ रस्त्यावर कोणशिलेची विधीवत पूजा करून नारळ फोडले आणि नंतर नामदार आमदार यांच्या हस्ते टिकाव टाकून भुमीपुजन करण्यात आले.





















