जागतिक महिला दिनानिमित्त सौ.धनश्री सुजय विखे व जनसेवा फौंडेशनतर्फे राहुरी -पाथर्डीत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा संपन्न ‌

 

(सुनिल नजन “चिफ ब्युरो” अहमदनगर जिल्हा) ‌ संपूर्ण देशभर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये अहमदनगर जिल्हा आघाडीवर होता. जिल्ह्याचे भाजपाचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ. धनश्रीताई विखे आणि जनसेवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी-पाथर्डी तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आला होता.महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक व संगीतकार अवधूत गुप्ते आणि नटरंग सिनेमा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. राहुरीत नगर-मनमाड रोडवर चर्च जवळील मैदानात,तर पाथर्डीतील मार्केट कमिटीच्या आवारात आणि शेवगाव येथे खंडोबा माळ मैदानात या खास महीलांसाठीच्या स्पेशल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाथर्डी येथील कार्यक्रमात खासदार सुजयदादा विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आणि रणरागिणी फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई विखे यांच्या हस्ते माणपत्र आणि पैठणी शालू देउन बारा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.महीलांच्या झालेल्या गर्दीचा उच्चांक पाहून गायक अवधुत गुप्ते,व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सुजयदादा विखे पाटील यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा खासदार होण्यासाठी सुबेच्छा दिल्या.कर्तुत्ववान महिला पैकी १) अनुराधा फुंदे,२)सुरेखा लोखंडे, ३) वैष्णवी मुखेकर ४)शितल टेके,५)उमामहेश्वरी बजाज,६) सुरेखा गोरे,७) विजया चोरमले,८) मीरा बडे,९)शिंधु आहेर,१०) पार्वती शिंदे,११) डॉ. आयेशा पठाण, १२)शिला जाधव या वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित मान्यवर महिलांना सन्मानित करण्यात आले. सर्वच तालुक्यातील महीलांच्या गर्दीचे उच्चांक पाहून राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुजयदादा विखे मात्र सर्व सामान्य महीलांच्या समस्या ऐकून गर्दीतच हरवून गेले होते.कलाकार रोहीत माने, आणि शिवाजी परब यांनी मात्र महीलांना आपल्या खुमासदार शैलीत कला सादर करून उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले.प्रेक्षक म्हणून आलेल्या महीलांचे लकी ड्रॉ कुपन जमा करून घेउन लहान मुलांच्या हस्ते कुपन काढून विजेत्या महिलांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात‌ आले. विखे पाटील परिवाराच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते.जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व महिलांना सुखरूप घरी पोहचवण्यासाठी विषेश गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते.खासदार सुजयदादा विखे पाटील सर्व बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून होते.विखे पाटील परिवाराचे अप्रतिम नियोजन काय असते ते जिल्ह्यातील नगर- राहुरी-पाथर्डी-शेवगाव-श्रीगोंदा, तालुक्यातील महिलांनी यांची देही याची डोळा पाहिले.संपुर्ण महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील विखेपाटील परीवारा सारखे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात कोणीही बरोबरी करू शकत नाही हे झालेल्या कार्यक्रमा वरून दिसून येते. लोकसभा निवडनुकी पुर्वी महीलांची गर्दी खेचण्यात विखेपाटील परीवार कमालीचा यशस्वी झाला आहे. विखे विरोधकांच्या महानाट्याला या सोहळ्याच्या निमित्ताने सडेतोड उत्तर मिळाले आहे.