श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा येथे जागतिक योगा दिवस उत्साहात संपन्न
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दि. 21 जून रोजी योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
.. . याप्रसंगी एम.एम. कॉलेज येथे कार्यरत असलेले योगाचार्य प्रा.श्री.अतुल सूर्यवंशी सर यांचा मुख्याध्यापक श्री.एन.आर.ठाकरे सर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
प्रा. अतुल सूर्यवंशी सर यांनी सर्वप्रथम विद्यार्थी व शिक्षकांना योगाचे मानवी जीवनात असलेले महत्त्व अधोरेखित केले.
… सूर्यनमस्कार, प्राणायाम, व इतर अनेक आसनांच्या माध्यमातून सरांनी विद्यार्थी व शिक्षकांना योगाचे धडे दिले.
. याप्रसंगी उपमुख्याध्यापक श्री. आर.एल. पाटील सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एम.टी.कौंडिण्य सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बी. एस. पाटील सर व आभार श्री.डी.डी. कुमावत सर यांनी केले.