महिला दिनी दिनानिमित्ताने महिलांसाठी विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले

दि.8 मार्च 202२ रोजी जि. प शाळा वडगाव (हडसण) ता. पाचोरा जि. जळगाव येथे महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. वंदना ईश्‍वर पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.अर्चना राजेंद्र पाटील होत्या.
महिला दिनी दिनानिमित्ताने गावातील संपूर्ण महिला उपस्थित होते .याप्रसंगी महिलांसाठी विशेष मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ‌मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर श्री‌म. अरुणा मुकुंदराव उदावंत यांनी एक तास मार्गदर्शन केले .यात मासिक पाळी समज गैरसमज, या दिवसात घ्यावयाची काळजी वापरावयाचे आधुनिक साहित्य अशा विविध विषयांवर त्यांनी गावातील महिलांशी सखोल चर्चा केली. महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावर श्रीम. स्वाती अमृतराव पाटील यांनी खूप छान पद्धतीने ओघवत्या भाषाशैलीत व आनंदी वातावरण निर्मिती करत जीवन जगण्याच्या सहज सोप्या पद्धतीने मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. स्त्री आरोग्य ,आहार आरोग्यदायी सवयी या विषयावर श्रीम. सोनाली म्हणजे सैंदाणे यांनी दैनंदिन जीवनातून उदाहरणे देत अवघड वाटणारा विषय सोपा करून सांगितला.
या कार्यक्रमाप्रसंगी गावात विशेष कार्य करणाऱ्या सर्व महिला भगिनींचा शाळेतर्फे शाल गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
गावातील शाळेत गेल्या तीन वर्षापासून विशेष कार्य करीत असलेल्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम‌ गायत्री सुभाष पाटील मॅडम यांचा सत्कार संवर्धन ईश्वर पाटील यांनी केला या प्रसंगी त्यांनी शाल श्रीफळ गुलाब पुष्प व साडी भेट दिली.शाळेत होत असलेल्या विविध उपक्रमांचे आणि शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे सर्व महिलांनी भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाची संकल्पना श्री सरदारसिंग नर्सिंग पाटील मुख्याध्यापक यांची होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. गायत्री पाटील यांनी केले तर प्रास्ताविक श्री. सरदारसिंग पाटील यांनी केले .
या कार्यक्रमासाठी सौ वंदना ईश्‍वर पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर सर्व अर्चना राजेंद्र पाटील यांनीही पूर्ण वेळ थांबून व महिलांना प्रोत्साहित करून कार्यक्रमात चैतन्य आणले.
सौ ‌कविता प्रमोद पाटील
सौ. रेखा पंकज पाटील सौ.सोनाली दीपक महाजन यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.