डॉ संपदा मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील,मृत्यू झाला सातारा जिल्ह्यातील फलटण येथे आणि त्याचा तपास आला अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील तेजस्विनी सातपुते यांच्या कडे 

डॉ संपदा मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील,मृत्यू झाला सातारा जिल्ह्यातील फलटण येथे आणि त्याचा तपास आला अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील तेजस्विनी सातपुते यांच्या कडे

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी तपासावर लक्ष ठेवण्यासाठी आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियु्क्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या नेमनुकीची घोषणा केली आहे.त्यांना त्वरित सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जाऊन मयत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी तपासाचा आढावा घेऊन वेळोवेळी अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी लगेचच सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जाऊन डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी तपासाची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत.तेजस्वीनी सातपुते मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील रहिवासी आहेत. मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करून त्यांनी आयपीएस दर्जाच्या अधिकारी या पदावर मजल मारून ऐटीत विराजमान झाल्या आहेत.त्यांनी पोलिस अधीक्षक आणि उपायुक्त म्हणून विविध ठिकाणी उत्कृष्ट काम केलेले आहे. आता या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या आणि देशभरात गाजलेल्या, महत्वाच्या आणि तेवढ्याच अतिशय संवेदनशील म्हणून गणल्या गेलेल्या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी सरकारने त्यांच्यावर सोपविली आहे. तेजस्वीनी सातपुते या सन २०१२ सालातील बॅचच्या आयपीएस दर्जाच्या अधिकारी आहेत. त्यांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातही पोलीस अधीक्षक म्हणून चांगली कामगिरी केलेली आहे.सातारा जिल्ह्याची त्यांना खडानखडा माहिती आहे. सध्या त्या पुणे येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या समदेशक म्हणून सेवेत कार्यरत आहेत. तेजस्विनी सातपुते या आपल्या कामातील अनुभवाच्या जीवावर मोठ्या सचोटीने आणि निरपेक्ष पणे मयत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची निःपक्षपाती पणे कसुन चौकशी करून मयत डॉ मुंडे यांच्या कुटुंबीयांना त्या निश्चितपणे न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे.त्यांच्या या कामकाजाने संपूर्ण राज्यभर अहिल्यानगर जिल्ह्याची मानस कन्या म्हणून त्यांचे नाव उंचावले जाणार आहे.तसेच देशात आणि राज्यभरात

ही अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने उज्ज्वल केले जाणार आहे.त्यांच्या या स्व: कर्तुत्वाला शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्रिवार सलाम आणि मानाचा मुजरा …