संभाजीनगर अॅथलेटिक्स स्पर्धेत बाबुरवजी काळे मराठी शाळेचा झंझावाती विजय
दत्तात्रय काटोले
संभाजीनगर – येथे नुकत्याच झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत कै. बाबुरवजी काळे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
चौदा वर्ष वयोगटातील १०० मीटर धावण्यात प्रथमेश मिसाळ याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर १७ वर्ष वयोगटातील ४x१०० मीटर रिले स्पर्धेत हर्षल शिनकर, विराज राऊत, तुषार बोडखे आणि भावेश खैरनार या चौघांनी प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा मान उंचावला.
या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा ज्योतीताई काळे, मुख्याध्यापक निलेश पाटील सर, शिक्षक कमलेश काळे सर,महेश मानकर, क्रीडा शिक्षक तसेच सर्व शिक्षकवृंद आणि पालकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
उत्कृष्ट कामगिरीमुळे हे विद्यार्थी आता विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वत्र विद्यार्थ्यांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

























