आजची महिला प्रत्येक क्षेत्रात अव्वल – CEO भाग्यश्री बानायत

आजची महिला प्रत्येक क्षेत्रात अव्वल – CEO भाग्यश्री बानायत

पुरुषांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात आजच्या युगात ताठ मानेने वावरणारी महिला प्रत्येक क्षेत्रात अव्वल असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थान शिर्डी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायात यांनी महिला दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले. कोपरगाव शहरातील श्री साई वासल्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

या प्रसंगी राज योगिनी ब्रम्हकुमारी सरला दीदी, उमाताई वहाडणे,श्रीमती मंगलताई कोते,आदर्श शिक्षिका कुंदाताई पाटील, छायाताई पाटील, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, नगरसेविका सपना मोरे , किरण डागा, मुंबई ग्राहक संरक्षण कक्षाच्या ऋतिका पन्नागुडे,मनीषा राऊत, छाया पाटील, मंदाताई, पाटील, डॉ.वर्षा झवंर, ललिता बंब, रोहिणी पुंडे, भावना गवांदे सीमा पानगव्हाणे, अर्जुनराव चौधरी, ग्लोबल महाराष्ट्राचे संपादक शिवाजी शिंदे, प्रशांत चौधरी आदिसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बनायत पुढे म्हणाल्या की, “आपण महिला दिन का साजरा करायचा.? ३६५ दिवस आपलेच असतात ना.! मग आपण महिला दिनच का साजरा करायचा- याचे मुख्य कारण म्हणजे एक दिवस आपण आपल्यासाठी आनंद घेण्यासाठी निवडावा हाच यामागचा खरा हेतू असतो. कारण जगात कुठेही कोणतेही क्षेत्र असे नाही की तिथे महिला नाही. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आजची महिला शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनिअर, पायलट, आय एस अधिकारी, पोलीस, सैनीक अश्या असे कुठल्याही क्षेत्रात मागे नाही, आणि विशेष म्हणजे आजची आपली महिला देशाच्या सर्वच्च राष्ट्पती पदापर्यंत गेली. आज पुरुष या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, त्यामुळे आजची महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत जगात असे कुठलेही क्षेत्र दाखवा की त्या ठिकाणी महिला नाही असे श्रीमती बनायात यांनी सांगत सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी श्री साई वात्सल्य संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रत्ना चांदगुडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले, की माझ्यावर अनेक दुःखाचे आघात झाले, त्यावर मात करुन अपंग, वृद्ध, निराधारांच, जे दुःख असतं ते मला झालेल्या आघातामुळे कळाले, असे दुःख कोणावर येऊ नये किंवा ज्यांच्यावर आले आहे त्यांना त्यातून सावरण्या करिता या संस्थेची स्थापना केली असून निराधाराना मायेचा आधार देणे हाच या मागचा मुख्य हेतू असल्याचे चांदगुडे यांनी आपल्या प्रसाविकात सांगितले.

श्री साई वात्सल्य बहुउद्देशीय संस्थेचे संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटक ब्रह्मकुमारी सरला दिदी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, रत्नाताईंना आपल्या माध्यमातून खूप मोठे कार्य करत असून परमेश्वर त्यांना खूप यश देवो, फक्त यशच नाही तर ते करत असलेल्या कार्याबद्दल अनेकांचे त्यांना आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. आजच्या कलियुगाच्या काळामध्ये वात्सल्याची कुटुंब, समाज आणि स्वतःच्या मनासाठी सुद्धा वात्सल्याच्या विचार महत्त्वाचे असून दे देण्याचे महान कार्य या करत आहे. रत्नाताईंनी आपल्या जीवनात खूप फार संघर्ष केला ते आपणाला माहीतच आहे पतीने व मुलाने देहत्याग केला अशा परिस्थितीत एखादी स्त्री काय विचार करू शकते की देवाने माझे किती वाईट केले मी किती दुर्दैवी आहे लहानपणापासून जन्मापासून असं मूल दिलं असे दुर्दैवाची रडणे रडत बसली असती. मात्र रत्नाताईनी या सर्व गोष्टीला झुगारून सर्व गोष्टीवर मात करून आपल्यापुढे एवढे मोठे संघटन तयार केले. ही तर सुरवात आहे यापुढेही त्यांची खूप प्रगती होणार याची मला शास्वती आहे आम्ही ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने त्यांच्यासाठी रोजच प्रार्थना करत राहु असे सरला दीदिनी व्यक्त करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला कोपरगाव काँग्रेसचे अध्यक्ष नितीनराव शिंदे, सेवादलाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, विजयराव जाधव, बहुजन आघाडीचे शरदराव खरात, शांतीलाल जोशी, बसवराज शिंदे, सोमनाथ कानकाटे, बिपिनराव गायकवाड, सोमनाथ डफाळ, विजय कापसे, शरद रोहमारे, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड ज्योती भुसे, ऍड शीतल देशमुख, डॉ.वर्षा झंवर, वर्षा नाईक, रत्ना भोंगळे, बाबा खुमानी आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता देवीसिंग परदेशीं, वैष्णवी प्रशांत चौधरी, सविता साळुंखे, सुप्रिया गर्जे, शोभाताई सातभाई, मंदाताई चौधरी, रिजवाना शेख, मोहसीना तांबोळी आदिनी विशेष परिश्रम घेतली. यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका , महिला पोलीस कॉन्स्टेबल, शिक्षिका, आरोग्य विभाग महिला कर्मचारी, महिला डॉक्टर, जिजाऊ मराठा महिला मंडळाच्या सदस्य, परीट समाज महिला मंडळ पदाधिकारी, पंचायत समितीच्या महिला कर्मचारी, महिला वकील, आदीसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
तसेच महिलांचा श्री साई वासल्य बहुद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्षा रत्नमाला कृष्णराव चांदगुडे यांनी सर्व उपस्थित महिलांचा महिला दिनी आकर्षक भेटवस्तू सन्मानपूर्वक प्रदान करून सर्व महिला भगिनींचा सन्मान केला.