पाचोरा कृष्णापुरी भागातील मुतारी संदर्भात न.पा मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले

पाचोरा कृष्णापुरी भागातील मुतारी संदर्भात न.पा मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले

पाचोरा शहरातील विविध विकास कामे झाली त्यात महत्त्वाचा म्हणजे पाचोरा शहराला जोडला जाणारा कृष्णापुरी भागातील हिवरा नदी वरचा पूल झाल्यामुळे या भागतील नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे. परंतु याठिकाणी पूर्वीपासून असलेली एक सार्वजनिक मुतारी रस्त्याच्या कामामुळे तोडण्यात आली असून पुन्हा मात्र ती बांधण्यात आली नाही. स्थानिक तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांची मुतारी नसल्याने गौरसोय झाली असून पुलाच्या पूर्ण झालेल्या कामानंतर प्रशासनाने याठिकाणी मुतारी बांधण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्यात यावे यासाठी जय हिंद लेझीम क्रीडा मंडळ तर्फे नगरपालिका मुख्य प्रशासक यांना लेखी निवेदन देऊन मुतारी लवकरात लवकर बांधण्यात यावी अशी मागणी केली यावेळी प्रमोद बारी, शरद गीते,प्रा.प्रदीप वाघ,अँड अविनाश सुतार,बाप्पू महाजन,सुदर्शन महाजन,दाऊ मिस्तरी, आप्पा पाटील,प्रा.नितीन पाटील,विनोद पाटील,समाधान पाटील,दीपक चित्ते,जीभाऊ पाटील,संदीप प्रकाश पाटील,जिभु शिंदे,संदीप मराठे,संदीपराजे,शरद आबा पाटील,विकास पाटील सर,संदीप माणिक पाटील,नाना खामकर,आकाश पाटील,ललित पुजारी,प्रमोद महाजन,प्रशांत सोनार,कैलास पाटील,आदी कृष्णापुरी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.