महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक होण्याच्या मार्ग मोकळा. ओबीसी नेते अनिल महाजन यांच्यासह माळी समाज व बहुजन समाज बांधवांच्या प्रयत्नांना यश

पाचोरा येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मारक होणारच.महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक होण्याच्या मार्ग मोकळा. ओबीसी नेते अनिल भाऊ महाजन यांच्यासह पाचोरा माळी समाज व बहुजन समाज बांधवांच्या प्रयत्नांना यश

पाचोरा स्टेशन रोड हुतात्मा स्मारकाच्या बाजूला नियोजित जागेवर महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक बांधण्यासाठी नगरपालिकेचे नगराध्यक्ष छोटू भाऊ गोहिल यांनी न.पा प्रशासन मुख्य अधिकारी शोभा बाविस्कर यांच्यासह नारळ फोडून केले उद्घाटन लवकरच आठ दिवसाच्या आत स्मारकाच्या बांधकामाला होणार सुरुवात ठेकेदार मुकुंद आण्णा बिल्दिकर यांनी दिला शब्द

पाचोरा शहरात महात्मा ज्योतिबा फुले स्मारक नियोजित जागेवर माळी / बहुजन समाजाची बैठक संपन्न झाली १५० ते२०० कार्यकर्ते उपस्थित होते. युवा नेते भाजपा तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्या मध्यस्थीने रमेश वाणी यांची तक्रार मागे घेण्यात आली फुले स्मारकाबद्दल काहीही तक्रार व्यापरी गाळे धारकाची राहणार नाही अशी गवाही अमोल भाऊ शिंदे यांनी यावेळी दिली. नगराध्यक्ष छोटू भाऊ गोहिल,न.पा उपनराध्यक्ष वाल्मिक पाटील, मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर व नगर अभियंता सूर्यवंशी, प्रशासकीय आधिकरी दगडू मराठे,ओबीसी नेते अनिल महाजन,नगरसेवक वासुदेव महाजन,विकास पाटील,अविनाश भालेराव गुजर समाजाचे सचिव संदीप महाजन व सर्व बहुजन समाजाचे कार्यकर्ते, माळी पंचमंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वाच्या उपस्थितीत नगराध्यक्ष छोटू गोहिल यांनी सदर जागेवर नारळ फोडून महात्मा जोतिबा फुले स्मारक चे उद्घाघटन केले लवकरच नगरपालिकेच्या वतीने जोतिबा फुले यांचे स्मारक केले जाईल असे नगरअध्यक्ष छोटू भाऊ गोहिल यांनी जाहीर केले. यावेळी बहुजन समाजाच्या वतीने ओबीसी नेते अनिल व महाजन यांनी नगरपालिका प्रशासन नगराध्यक्ष सर्व नगरसेवक भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे या सर्व मान्यवरांचे आभार मानले ओबीसी नेते अनिल भाऊ महाजन व पाचोरा शहरातील माळी पंचमंडळ कार्यकारणी व बहुजन समाजाचे कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले याबद्दल तालुक्यातील सर्व माळी बहुजन समाजातील कार्यकर्त्यांमध्ये अनिल महाजन व पंचमंडळ चे पदाधिकारी यांचे कौतुक केले जात आहे अभिनंदन होत आहे