पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन

पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन

 

पाचोरा: -आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा येथील निर्मल सीड्सच्या कृषीदालनात चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आढावा बैठक उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती, संघटनात्मक बळकटी, तसेच गट आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “निवडणुका या फक्त राजकीय नव्हेत, तर विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या असतात. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारधारेसह विकासाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.” त्यांनी संघटनशक्ती आणि तळागाळातील संवादाचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन केले.

या बैठकीत काही नव्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. बैठकीत दिलीपभाऊ वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, अमोलभाऊ शिंदे, प्रताप हरी पाटील, अमोल नाना पाटील, मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, संजय नाना वाघ, गोविंद शेलार, दीपक माने, शोभाताई तेली, अनिल पाटील, विनोद नेरकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या आढावा बैठकीमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्मी आणि संघटनात्मक एकात्मता जाणवली.