परधाडे येथील विकास सोसायटी च्या संचालक पदाच्या पोट निवडणूकीत गुरूदास महाजन बिनविरोध

परधाडे येथील विकास सोसायटी च्या संचालक पदाच्या पोट निवडणूकीत गुरूदास महाजन बिनविरोध

नांद्र(ता.पाचोरा)ता.३ परधाडे येथील विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायटी पोटनिवडणुकीत भाजपाचे गुरुदास महाजन यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली. या प्रसंगी विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन भागवत पाटील ,व्हॉ.चेअरमन सिंधुताई पाटील, संचालक गोपाल पाटील, नलुबाई पाटील ,अशोक पाटील, रामकृष्ण पाटील ,अतुल महाजन, मुकेश पाटील, विठ्ठल सोनवणे, लिलाबाई पाटील सह पाचोरा पंचायत समितीची माजी सभापती बन्सीलाल पाटील, भाजपाचे एकनाथ महाजन, शुभम पाटील ,सरपंच सचिन पाटील ,रघुनाथ पाटील ,सागर पाटील ,वसंत पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री राऊत तथा सचिव गणेश पाटील , कर्मचारी प्रकाश कोळी आदींनी कामकाज पाहिले या निवडी प्रसंगी भाजपा पाचोरा तालुका अध्यक्ष युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी गुरुदास महाजन यांचे अभिनंदन केले.
(पाचोरा) परधाडे येथील वि.का.सो.चे नवनीयुक्त संचालक गुरुदास महाजन यांचा सत्कार करतांना भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे ,माजी सभापती बंन्शीलाल पाटील.