श्री. गो .से .हायस्कूल, पाचोरा. येथे तृणधान्य पाक स्पर्धा उत्साहात साजरी

श्री. गो .से .हायस्कूल, पाचोरा. येथे तृणधान्य पाक स्पर्धा उत्साहात साजरी

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दिनांक 11 सप्टेंबर रोजी तृणधान्य पाक स्पर्धा उत्साहात संपन्न झाली यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत तांदळाचे मोमोज, नाचणीची भाकरी, मिक्स तृणधान्यांपासून बनलेली दशमी, भगरीचे पदार्थ, साबुदाण्याचे पदार्थ, इत्यादी पदार्थ माता पालकांनी आणि शिक्षिका, शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिलांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी माता पालक मधून प्रथम क्रमांक प्रतिभा संदीप परदेशी, द्वितीय क्रमांक उर्मिला मिस्तरी, तृतीय क्रमांक सोनल डीगंबर पाटील व सविता उमेश आमले.इत्यादी स्पर्धकांना देण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. बी. बोरसे. यांनी विद्यार्थ्यांना तृणधान्य पाक स्पर्धेविषयी व पदार्थांविषयी माहिती दिली व विद्यार्थ्यांनी एक सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या महिनाभरात या गोष्टींचा अवलंब करावा. व दररोजच्या आहारात समावेश करावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, प्रमुख अतिथी उपमुख्याध्यापक एन. आर. पाटील उपस्थित होते. माता पालकांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा पाटील, शितल महाजन, प्रमोद पाटील, ज्योती ठाकरे, शितल साळुंखे, गायत्री पाटील यांनी केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन .एस. पाटील. शिक्षकांमधून सहभागी नीता पाटील,रवींद्र जाधव यांनी सहभाग घेतला.