रोटरी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांची पाचोरा भडगाव रोटरी क्लबला भेट

रोटरी प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांची पाचोरा भडगाव रोटरी क्लबला भेट

पाचोरा (प्रतिनिधी)
रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) डॉ. आनंद झुनझुनवाला व उप प्रांतपाल (असिस्टंट गव्हर्नर) रो. विकास पाचपांडे यांनी काल दिनांक 20 ऑगस्ट रोजी रोटरी क्लब पाचोरा भडगाव ला भेट देऊन रोटरी सदस्यांशी हितगूज केली.

येथील हुतात्मा स्मारकाच्या सभागृहात रोटरी क्लब सदस्यांची बैठक संपन्न झाली. प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवला व उपप्रांतपाल विकास पांडे यांच्यासह स्थानिक रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ अमोल जाधव सेक्रेटरी गोरखनाथ महाजन मंचावर उपस्थित होते. रोटरी क्लब तर्फे दोनही मान्यवरांचे अनुक्रमे उपप्रांतपाल रो. राजेश मोर व जेष्ठ रोटेरियन चंद्रकांत लोढाया यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सौ. मोनिका झुनजूनवाला व सौ. सुनीता पाचपांडे यांचे डॉ.वैशाली जाधव, सौ.वर्षा पाटील यांनी स्वागत केले.

डॉ अजयसिंग परदेशी यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी दीपक पाटील, मनोज केसवानी, व जयेश पाटील या नवीन सदस्यांना रोटरी क्लब चे सदस्यत्व देण्यात आले. उप प्रांतपाल विकास पाचपांडे यांनी प्रांतपाल यांचा परिचय करून मार्गदर्शन केले. तर प्रांतपाल डॉ आनंद झुनझुनवाला यांनी रोटरी सदस्यांना रोटरी क्लब विषयी सखोल मार्गदर्शन केले. यात क्लब व्यवस्थापन, बैठका, विविध प्रकल्प, सदस्यत्व वाढ, तसेच अगदीच लहान लहान उपक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी सेवा कशी देता येईल, याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी क्लबचे सदस्य उद्योजक प्रदीप बापू पाटील यांची पुढील वर्षीच्या उपप्रांतपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रांतपाल रोड आनंद झुनझुनवाला यांचे हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. रो.प्रा. शिवाजी शिंदे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. पाचोरा भडगाव रोटरी क्लबचे सेक्रेटरी गोरखनाथ महाजन यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.

या बैठकीला रो. भरत सिनकर, रो. रुपेश शिंदे, रो. डॉ पंकज शिंदे , रो. रावसाहेब पाटील, रो. डॉ. स्वप्नील पाटील, रो. डॉ. किशोर पाटील रो.डॉ. प्रशांत पाटील, सुयोग जैन, डॉ. वैभव सुर्यवंशी, डॉ, पवन पाटील, डॉ. विशाल पाटील, डॉ.बाळकृष्ण पाटील यांचेसह सुमारे 40 सदस्य उपस्थित होते.