औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची नाशिक या संस्थेस राज्यातील सर्वोत्कृष्ट आयटीआय चा पुरस्कार प्रदान

औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची नाशिक या संस्थेस राज्यातील सर्वोत्कृष्ट आयटीआय चा पुरस्कार प्रदान

ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृहात जागतिक कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री आदरणीय श्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्वोत्कृष्ट आयटीआयचे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची नाशिक या संस्थेस सर्वोत्कृष्ट आयटीआयचा पुरस्कार रुपये पाच लाख,प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सचिव माननीय श्री आशिष कुमार सिंह आयुक्त आयुक्त एन रामास्वामी तसेच य्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्याचे संचालक मा.श्री दिगंबर दळवी साहेब, सहसंचालक श्री पी एम वाकडे साहेब उपस्थित होते संस्थेच्या वतीने हा पुरस्कार पाचोरा येथील रहिवासी प्राध्यापक मनीष बाविस्कर यांचे लहान बंधू व देशमुखवाडी परिसरातील यादव परिवाराचे जावई तथा संस्थेचे प्राचार्य श्री दीपक बाविस्कर,संस्थेच्या संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष मंडलेचा व वरिष्ठ निदेशक श्री संजय मस्के यांनी स्वीकारला.