नांद्रा परिसरात ढगाळ व सुरकी वारगी मुळे दादरी पिके जमीनदोस्त

नांद्रा परिसरात ढगाळ व सुरकी वारगी मुळे दादरी पिके जमीनदोस्त

नांद्रा पाचोरा( वार्ताहर)-यावर्षी प्रत्येक महिन्यात निसर्ग आपले रूप पालट्त आहे त्यामध्येच जानेवारी महिना सुरू होऊनही पावसाचा गारपीट,सुरकी वारर्गी अशा अस्मानी-सुलतानी संकटांचा निसर्गाचा कहर संपता संपने चे नाव घेत नाही आहे याचाच फटका शेतकरी वर्गा ला बसत असून येतील शेतकरी यशवंत पवार यांच्या शेतातील गट नंबर 267,268/1 यामध्ये असलेली 3ऐकर दादर याच सुरकी वारर्गी मुळे पूर्णतः आडवी पडून जमीन दोस्त झाली आहैत अशी च परिस्थिती परिसरातील शेतकरी वर्गाची पिकांची पण आहै .गेल्या आठ दिवसापासून हवामानाच्या झालेल्या ढगाळ वातावरण व वाऱ्यामुळे नांद्रा सह पाहन व इतर खेड्यात ऐन निसण्यावर आलेल्या दादरी यांची वाढ पूर्ण झाल्याने त्या शेतात डोलदार उभे असतानाच सतत जोरदार वाहणार्‍या वार्‍यांमुळे त्या जमीनदोस्त झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा पुढे आता या दादर कापणे,काढणे,साठी लागणारी मजुरी मोठी चिंता निर्माण झाली आहे त्यामुळे अगोदरच अतिवृष्टीचा फटका यानंतर या अवकाळी पावसाचा फटका यामुळे आता निसर्गाच्या गारपीट व वाहणाऱ्या वाऱ्यांचा, धुक याचा फटका दादर सह मका,ज्वारी, सूर्यफूल या पिकांवर आता बसणार असून या ठिकाणी शासनाने उचित पंचनामे करून योग्य दि भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी वर्ग मधून होत आहे