गो.पु.पाटील,विद्यालय,कोळगाव येथे शिक्षक दिन साजरा

गो.पु.पाटील,विद्यालय,कोळगाव येथे शिक्षक दिन साजरा

कोळगाव (भडगाव)- कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव,संचलीत,गो.पु.पाटील विद्यालय,कोळगाव येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती,शिक्षक दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल पाटील होते.प्रसंगी माता सरस्वती,कर्मवीर तात्याबाबा आणि माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन,यांच्या प्रतिमेचे पुजन पर्यवेक्षक अनिल पवार केले.इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी, शिक्षकांच्या भूमिकेत कामकाज पाहिले,मुख्याध्यापक म्हणून कु.देवयानी पाटील, पर्यवेक्षक चि.शरद पाटील ,तसेच विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन करीत विद्यालयाचे कामकाज पाहिले. अनेक विद्यार्थ्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून,श्री.एस.ए.वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सुनिल पाटील यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत कौतुक केले.
शिक्षक दिनाचे संपूर्ण नियोजन, संजय पाटील,एस.ए.वाघ,श्री.सी. बी.भोसले यांनी केले.सर्व सहभागी विद्यार्थी शिक्षक-शिक्षिकांना पेन सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.
अतिशय सुंदर असे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रीना पाटील व रोशनी पाटील यांनी केले,आभार कु.देवयानी पाटील हिने मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु -भगिनी यांनी परिश्रम घेतले.