कासार पिंपळगाव, कोपरे,जवखेडे, तिसगाव येथे शारदिय नवरात्र महोत्सवाचा जोरदार धुमधडाका
(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) देशभर शारदिय नवरात्र महोत्सव साजरा होत असताना अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, तिसगाव जवखेडे,कोपरे या गावात नवरात्र महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे.कासार पिंपळगाव येथे शेषनारायण म्हस्के, बाळासाहेब म्हस्के,शिवाजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व म्हस्के परीवारा तर्फे गावातील तुळजाभवानी मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळ महाआरतीचे आयोजन करण्यात येत आहे.नंतर फराळाचे वाटप करण्यात येते.रात्री देवीचा गोंधळाचा कार्यक्रम संपन्न होतो.कोजागिरी पौर्णीमेच्या दिवशी सकाळी काल्याचे किर्तन होउन महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.तसेच गावातील महालक्ष्मी मंदिरात ही दररोज सकाळ संध्याकाळ कांबळे परीवारातर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात येते.नंतर भाविक भक्तांतर्फे फराळाचे वाटप करण्यात येते. तसेच रात्री भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.दसऱ्याच्या आदल्या दिवशी होमहवन होऊन दुसऱ्या दिवशी आमटी भाकरी च्या महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होते. कोपरे येथे मळगंगा मंदिरात सायंकाळी हरीपाठ होउन दररोज रात्री सात ते नउ या वेळेत ह.भ.प. किशोरानंद महाराज यांच्या वाणीतून देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.नंतर भाविकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. जवखेडे खालसा येथील डागातील देवीच्या तुळजाभवानी मंदिरात दिनांक २२सप्टें.ते २ ऑक्टो.या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.गणेश महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.जवखेडे दुमाला येथील रेणुका माता मंदिरात अजितराव शिवाजी नेहुल पाटील यांच्या वतीने ह.भ.प.स्वामीनी दिदी महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.या मंदीराची देखभाल करण्यासाठी उद्धव नेहुल, ताराचंद नेहुल,संपत कसोटे,लक्ष्मण नेहुल,संभाजी नेहुल,बबनराव नेहुल,हरीभाऊ नेहुल,सागर नेहुल, बाळासाहेब नेहुल, ज्ञानेश्वर मुजमुले, विजय सोनवणे, दादासाहेब नेहुल, सेवक महादेव भारती हे सतत प्रयत्नशील असतात.तिसगाव येथील तुळजाभवानी मंदिरात दररोज रात्री धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.एकंदरीतच कासार पिंपळगाव पंचक्रोशीत नवरात्र महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे.