बायकोने घटस्फोटाची नोटिस पावल्याच्या कारणावरुन तीचे अपहरण करून गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

बायकोने घटस्फोटाची नोटिस पावल्याच्या कारणावरुन तीचे अपहरण करून गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

बायकोने तीच्या नवऱ्याला कायदेशीर घटस्फोटाची नोटीस पाठवली म्हणून तीचे अपहरण करून तीचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन तासातच मुसक्या आवळल्या मुळे पुढील अनर्थ टळला आहे. या बाबदची माहिती अशी की, दिनांक 28/11/2025 रोजी अहिल्या नगर येथील पोलीस नियंत्रण कक्षास विना नंबरच्या पांढऱ्या मारुती सुझुकी बोलेरो कार मधुन दोन महिलांचे दरेवाडी गावातुन अपहरण झाल्याची माहिती मिळाली होती. अहिल्यानगर च्या नियंत्रण कक्षाने सदर माहिती ताबडतोब स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी साहेब यांना कळवुन झटपट कारवाई करणेकामी कळविले होते.

पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी साहेब यांनी लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे,पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे,फुरकान शेख,गणेश लबडे, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, रोहित येमुल, महादेव भांड, महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे,भाग्यश्री भिटे,चिमा काळे यांचे एक पथक तयार करुन अपहरण झालेल्या महिलांचा व आरोपीचा शोध घेणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन सदर पथकास तात्काळ रवाना केले होते.

सदर पथकाने तात्काळ दरेवाडी, चास शिवारात जावुन मिळालेल्या माहीतीतील विना नंबरचे वाहन पांढऱ्या मारुती सुझुकी बोलेरो कारचा शोध घेत असतांना चास गांवचे शिवारातील पोलीस चौकी परिसरामध्ये एक इसम व एक महिला संशयीत रित्या फिरताना आढळून आले.पोलीस पथकास सदर महिला व पुरुष यांचेवर संशय बळावल्याने पथक त्यांचेकडे जात असतांना ते तेथुन पळुन जावु लागले असताना पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना रंगेहाथ पकडले व ताब्यात घेत,त्यांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) रोहन बाबासाहेब पवार (वय 25 वर्षे),राहणार सारोळाबध्दी, ता. जि. अहिल्यानगर, 2) सिमा अंबर पवार (वय 42 वर्षे), रा. एकविरा चौक, ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे अपहरण केलेल्या महिलांबाबत सखोल व बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी सदरच्या दोन्ही महिलांना अरणगांव शिवारात, बायपास रोडजवळील अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या जंगलात नेऊन सोडले असल्याचे सांगितले.

ताब्यातील महिला व पुरुष यांचेसह अरणगांव शिवारातील बायपास रोडजवळील अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या जंगलामध्ये शोध घेतला असता अपहरित महिला नामे 1) अदिती प्रविण ढेपे (वय 22 वर्षे), रा. चेतना कॉलनी, प्लॉट नं. 35, नवनागापुर, एम.आय.डी.सी. अहिल्यानगर, 2) सुरेखा प्रविण ढेपे,(वय 43 वर्षे), रा. चेतना कॉलनी, प्लॉट नं. 35, नवनागापुर, एम.आय.डी.सी. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.त्यांना रोहन बाबासाहेब पवार व सिमा अंबर पवार या दोघांनी अपहरण केलेली महिला नामे अदिती ढेपे हिने तिचे पती ऋषीकेश दिलीप मोरे यास कायदेशीर घटस्फोटाची नोटीस पाठविल्याच्या कारणावरुन तीचे अपहरण करुन तीचा गळा दाबुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सांगितली .

पोलीसांच्या ताब्यातील संशयित आरोपी 1) रोहन बाबासाहेब पवार (वय 25 वर्षे), रा. सारोळाबध्दी, ता. जि. अहिल्यानगर, 2) सिमा अंबर पवार (वय 42 वर्षे), रा. एकविरा चौक, ता. जि. अहिल्यानगर यांचेविरुध्द अदिती प्रविण ढेपे,(वय 22 वर्षे), रा. चेतना कॉलनी,प्लॉट नं. 35,नवनागापुर, एम.आय.डी.सी. अहिल्यानगर हिने दिलेल्या तक्रारीवरुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा.रजिस्टर. नंबर. 625/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 126 (2), 140(3), 115(2), 352, 351 (2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई ही अहिल्या नगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. नियंत्रण कक्षास माहिती मिळताच पोलिसांनी अतिशय तत्परतेने ही कारवाई केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.सदर संशयित आरोपीच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या असुन आता त्यांची पोलिस कोठडीत कसुन चौकशी सुरू आहे. “कानून के हाथ बहोत लंबे होते है” हे या घडलेल्या घटनेवरून दिसून येते.