पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पारध बु. येथे शिधापत्रिका दुरुस्ती व नवीन नोंदणी कॅम्प
पारध ( भोकरदन तालुका प्रतिनिधी – महेंद्र बेराड):
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या देशभर राबविण्यात येत असलेल्या “सेवा पंधरवाडा” कार्यक्रमाच्या अनुषंगाने भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथे शिधापत्रिकेतील नाव दुरुस्ती व नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले.
शनिवार, दि. २७ रोजी पारध येथील महर्षी पराशर महाराज सभागृहात भाजपाच्या वतीने घेण्यात आलेल्या या कॅम्पचे नेतृत्व माजी सभापती परमेश्वर लोखंडे, माजी सरपंच गणेश लोखंडे व सागर देशमुख यांनी केले.
या कॅम्पसाठी पुरवठा विभागाच्या वतीने नायब तहसीलदार सदानंद नाईक, मंडळ अधिकारी डी.एम. होरगुळे, पुरवठा विभागाचे अनिल कानडजे, ग्रामविकास अधिकारी संजय पुरी, तसेच तलाठी अमोल तळेकर यांनी उपस्थित राहून लाभार्थ्यांना शिधापत्रिकेतील विविध दुरुस्ती व नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच पती बाबुराव काकफळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश आल्हाट, समाधान डोईफोडे, संतोष पाखरे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास लोखंडे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सागर देशमुख, पांडू लोखंडे, विनोद तेलंग्रे, पंजाब देशमुख, अरुण काटोले, अक्षय लोखंडे, योगेश देशमुख, भारत लोखंडे, विजय तबडे, मंगेश देशमुख यांसह ग्रामस्थांनी उत्साहाने परिश्रम घेतले.