Home पाचोरा पाचोरा – भडगाव मतदार संघांचे आमदार. किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य...

पाचोरा – भडगाव मतदार संघांचे आमदार. किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

पाचोरा – भडगाव मतदार संघांचे आमदार. किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

 

 

 

 

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था पाचोरा तसेच द युनिक अकॅडमी शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा-भडगाव तालुक्यातील विद्यर्थ्यांसाठी मोफत व खुली र सामान्य जञान स्पर्धा,रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 202५ सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर व्यापारी भवन पाचोरा येथे आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्थेत आकर्षक बक्षीस तसेच 3 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत यूपीएससी आणि एमपीएससी बाबत मोफत मार्गदर्शन देखील द यूनिक अकॅडमी जळगाव या शाखेत मिळणार आहे. परीक्षा प्रत्क्ष ऑफलाईन स्वरूपात असेल, विद्यार्थयानी एक तास आधी उपस्थित राहावे,परीक्षा अकरा वाजता वेळेवर सुरू होईल, परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी असेल,परीक्षेत मोबाईलचा वापर करता येणार नाही,शंभर प्रश्ांची परीक्षा असून त्यामध्ये जनरल नॉलेज,चालू घडामोडी,गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातील. यासाठी ऑनलाईन लिंकद्धारे नोंदणी करणे आवश्यक आहे ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही त्यांना परीक्षेत बसता येणार नाही परीक्षेसाठी वयोमर्यादा असेल 18 ते ३4 वर्ष, सोबत येताना पॅड पेन कोरा कागद आणावे तरी पाचोरा भडगाव मतदार संघातील विद्यार्थ्याना किशोर आप्पा पाटील यांच्यातर्फे आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या परीक्षेचा लाभ घ्यावा जेणेकरून भविष्यात याचा बुद्धिमत्ता विकासासाठी चालना मिळेल. 👉🏻👉🏻👉🏻  ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी लिंकला भेट देऊन आपले नावं निश्चित करा https://forms.gle/V9iZm4MJ8mNSqMq97

Don`t copy text!