पाथर्डी पोलिस स्टेशन तर्फे तालुक्यातील पाच मंडळांना पारीतोषीक

पाथर्डी पोलिस स्टेशन तर्फे तालुक्यातील पाच मंडळांना पारीतोषीक

 

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) उत्कृष्ट देखावा, सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन, आणि सामाजिक जाणीव जागृतीद्वारे संदेश देणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना पाथर्डी पोलिस स्टेशनतर्फे एकूण पाच पारीतोषिके देण्यात येणार आहे.तालुक्यातील नोंदणीकृत २३१ सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.पहिल्या पाच मंडळांना सन्मानपत्र,ट्राॅफी,व रोख स्वरूपात पारीतोषिक देण्यात येणार आहे.सदर स्पर्धा ही फक्त देखाव्यापुर्ती मर्यादित नसून गणेश मंडळांनी वर्षेभर केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन गणेशोत्सव काळात जबाबदारीचे भान ठेवून केलेल्या कामाचा आढावा समिती कडून घेऊन काही मुद्दे विचारात घेऊनच देण्यात येणाऱ्या बक्षिसांचा विचार केला जाणार आहे.बक्षिसासाठी विचारात घेतले जाणारे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत.१)डीजेमुक्त गणेश उत्सव मिरवणूक,२) संपूर्ण वर्षभर राबविले गेलेले सामाजिक उपक्रम,३) मिरवणूक देखाव्याद्वारे देण्यात येणारे सामाजिक संदेश,४) ध्वनी प्रदूषण विरहित परीसर निर्मिती,५) सामाजिक जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे प्रयत्न,६) गणेश भक्तांना पुरविण्यात येणाऱ्या सुखसुविधांची उपलब्धता इत्यादी गोष्टींचा विचार केला जाणार आहे.वेगवेगळ्या खात्यातील प्रमुख अधिकाऱ्या मार्फत गुप्त पणे निरीक्षण करूनच ही बक्षिसे देण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी साठी कोणत्याही प्रकारची स्वतंत्र नोंदणी प्रक्रिया ठेवलेली नसुन निवड समितीचे सदस्य प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निरीक्षण करून पात्र मंडळाची निवड करणार आहेत.या मध्ये कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी होणार नाही. या निवड समितीत शेवगाव पाथर्डी दूरक्षेत्राचे प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेशजी उगले साहेब,पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक साहेब,पाथर्डी नगर पालीकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे साहेब,आणि पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती गणेश मंडळांची पारीतोषीका साठी निवड करणार आहे.सदर पारितोषिकाचा निकाल हा गणेशोत्सव काळातील गणेश मंडळांच्या कामकाजाची तपासणी करून सदर गणेश मंडळांने वर्षभर केलेल्या कामाचा आढावा घेऊन पारीतोषिकाची घोषणा करण्यात येणार आहे.यामध्ये सामाजिक जनजागृती आणि सामाजिक जबाबदारीच्या शिस्तीचे पालन या घटकांना विषेश असे अधिक महत्त्व दिले जाणार आहे.पाथर्डी पोलिस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक कार्य आणि शिस्तबद्ध अशी सकारात्मक स्पर्धा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.तरी पाथर्डी तालुक्यातील गणेश मंडळांनी या स्पर्धेत भाग घेऊन राष्ट्रीय एकात्मता,जाणिव जागृती,आवाजाचं प्रदुषण,आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृती सादर करून या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी केले आहे.मात्र डीजे वाजवणाऱ्यावर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून कडक कारवाई करून डीजे जप्त करण्यात येणार आहे.काही गावात डीजेचा आवाज आल्याच्या बातम्या पोलीसांच्या कानावर आल्या आहेत.त्यांच्यावर मात्र कारवाई अटळ आहे.