पाचोऱ्यात वार्डातील घाणीचे साम्राज्य पाहून नगरसेवक सह कार्यकर्ता उतरले मैदानात

पाचोरा शहरातील काही प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य असे असतांना एका प्रभागाचे मा.नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने केली साफसफाई

पाचोरा प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार

पाचोरा-नगरपालिका व आरोग्य विभाग घेत आहे कुंभकर्णी झोपेचे सोंग,,,

पाचोरा शहराचा अती नाही तर उत्तम रित्या सुंदर स्वच्छ शहर असा कायापालट झाला आहे, पाचोरा शहराचा चेहराचा बदलेला आहे जर कुणी चार-पाच वर्षाआधी उदरनिर्वाह करीता बाहेरगावी गेला असेल व तो जर काही कामानिमित्त जर पाचोरा शहरात दाखल झाला तर त्याला विश्वास बसत नाही की पाचोरा शहर इतके सुंदर रस्ते स्वच्छता, पाचोरा शहराच्या रस्त्यांची,स्वच्छतेची चर्चा ही आजुबाजुच्या खेड्यात , तालुक्यात जिल्ह्यात नाहीतर महाराष्ट्रात सर्वात सुंदर स्वच्छ शहर रस्त्यांची कामे उत्कृष्ट प्रकारे झालेली आहे प्रशंसा व चर्चा अशी वाह-वाह असतानाच पाचोरा शहरातील काही प्रभागामध्ये “पाचोरा नगरपालिका” ही दुर्लक्ष करीत आहे म्हणजेच कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे,,कुठे-कुठे बारीक बारीक चाळीत रस्ते पुर्ण तर कुठे अपुर्ण रस्ते सोडुन दिलेली आहेत तसेच काही ठिकाणी म्हणजेच प्रभाग क्र ३मधील रेणुकामाता मंदीर शेजारी गटारीत घाणीचे साम्राज्य, रहिवासी नागरिक त्रस्त, पाचोरा शहरातील प्रसारमाध्यमे गृपवर आणि प्रत्येकाकडुन “पाचोरा न.पा.प्रशासना” ला वारंवार *”प्र.क्र.3 चे कचरा व गटारी चे पाचोरा न पा सदस्य गृप वर गटारी चे फोटो व्हायरल होताहेत तरी ही टाकुन ही *”आरोग्य विभागा”* तर्फे कुठली ही *कारवाई, अथवा दखल* घेतली गेली नाही म्हणुन पाचोरा प्रभाग क्रमांक ३चे *मा. नगरसेवक सतिष चेडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी* स्वखर्चाने *ट्रॅक्टर भाड्या* ने लावुन कचरा साफ केला कारण शरद ट्रेडींग कंपनी च्या गोडाऊनच्या मागील बाजुचा म्हणजे तेथे जि.प.ची प्राथमिक ,विद्यालय रेणुका माता देवस्थान आहे तेथे नागरीक लहान बालक शाळकरी मुलांचा सतत ये-जा आहे, त्यामुळे मा.नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज ही भुमिका घेत कचरा साफ केला,कारण वारंवार फोटो टाकुन ही *”आरोग्य विभागा”* तर्फे कुठली ही दखल घेतली गेली नाही.म्हणुन नगरपालिका पाचोरा प्रशासनाने तातडीने पाचोरा शहरातील समस्या ग्रस्त पाहणी करावी अशी संतप्त चर्चा होत आहे