कवी प्रकाश तेली यांच्या खाद्य सुरक्षा काव्य संग्रहाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते व मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्तिथित मुंबई येथे प्रकाशन

कवी प्रकाश तेली यांच्या खाद्य सुरक्षा काव्य संग्रहाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते  मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्तिथित मुंबई येथे प्रकाशन

 

जळगाव :- कवी प्रकाश रामदास तेली यांच्या खाद्य सुरक्षा हिंदी काव्य संग्रहाचे प्रकाशन मुंबई येथे मंत्री मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते  मंत्री दीपक केसरकर यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे झाले 

काय आहे खाद्य सुरक्षा काव्यसंग्रहात :-

                खाद्य सुरक्षा काव्य संग्रहात भूकेचे दुष्परिणामअन्नाचे महत्वअन्न बचतीची आवश्यकताआणि उद्याच्या अन्नाची गरज ह्यासोबतच अनेक पैलुंवर प्रकाश तेली यांनी प्रकाश टाकला असून अन्न बचत करने किती गरजेचे आहे हे ह्या काव्य संग्रहातुन दाखविलेले आहे अन्न सुरक्षेकरिता शासन आणि इतर स्तरावर तसेच विविध सामाजिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे ह्या सर्वांच्या प्रयत्नांना अधिक चालनाप्रोत्साहन यश मिळावे ह्याकरिता  खाद्य सुरक्षा काव्य संग्रह लिहिल्याचे कवी प्रकाश तेली यांनी सांगितले

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून खाद्य सुरक्षा काव्य संग्रहाचे कौतुक :-

          खाद्य सुरक्षा सारख्या अत्यंत महत्वपूर्ण विषयावर लिखाण केल्याबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खाद्य सुरक्षा काव्य संग्रहाचे कौतुक केले  तेली यांच्या साहीत्यिक  सामाजिक कार्यास शुभेच्छा  दिल्या

खाद्य सुरक्षा काव्य संग्रहास डॉहिमांशू पाठकसचिव (DARE) आणि महासंचालक (ICAR)

भारतीय कृषी संशोधन परिषद यांनीं  खालील प्रमाणे संदेश दिलेला आहे

      कवी प्रकाश तेलीजी यांनी लिहिलेला खाद्य सुरक्षा कविता संग्रह वाचून खूप आनंद झाला.तेलीजींनी अतिशय सर्जनशील आणि सोप्या पद्धतीने कविता लिहिल्या आहेत.त्यांचे लेखन मनाला स्पर्श करते तेलीजींच्या लिखाणात आपुलकीची भावना आहेत्यांची लेखनपद्धती अनोखी आणि नाविन्यपूर्ण आहे.

         खाद्य सुरक्षा कविता संग्रह जसजसा आपण वाचतो तसतशी त्यात अधिक उत्सुकता निर्माण होत जाते.तेलीजींचे देशावरील प्रेम या काव्यसंग्रहातूनही स्पष्टपणे दिसून येते.ते एक सामाजिक कवी आहेत आणि त्यांचे विषय इतर सर्वांपेक्षा वेगळे आहेत आणि राष्ट्र प्रगतीसाठीचे आहेतदेशाप्रती आपली जबाबदारी ते साहित्यातून पार पाडत आहे.

          त्यांनी अन्न बचत आणि अन्नाची नासाडी यावर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकला आहे.यामुळे अन्नाची बचत आणि अन्नाची नासाडी थांबवण्यास नक्कीच मदत होईल.अन्न सुरक्षा अभियान आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहे.त्यासाठी अन्नाची बचत करणे.आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे.

          अन्नामुळे देशाची दिशा आणि स्थिती बदलतेत्याकडे लक्ष देणे सर्वात गरजेचे आहे.