चोपडा महाविद्यालयात ‘पौष्टिक तृणधान्य (मिलेट)जाणीव जागृती कार्यक्रमाचे’ आयोजन

चोपडा महाविद्यालयात ‘पौष्टिक तृणधान्य (मिलेट)जाणीव जागृती कार्यक्रमाचे’ आयोजन

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविदयालयात ‘महाराष्ट्र श्री अन्न (पौष्टिक तृणधान्य) अभियान २०२३’ अंतर्गत दि.२१ सप्टेंबर २०२३ रोजी ‘पौष्टिक तृणधान्य जाणीव जागृती कार्यक्रमाचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन चोपडा तालुक्याचे कृषी अधिकारी दिपक साळुंखे यांच्या हस्ते परीसरातील तृणधान्यांचे (मिलेटस) पूजन करून करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी हे उपस्थित होते. यावेळी वनस्पतीशास्र विभागप्रमुख प्रा. डॉ.आर.एम.बागुल, डॉ. पी. एन. सौदागर, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ.एम. एल.भुसारे आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.डॉ
आर.एम.बागुल यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे व कृषी अधिकारी दिपक साळुंखे यांनी तृणधान्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदशन करतांना ‘शेतीतील जैवविविधता कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.याप्रसंगी तृणधान्य लागवड योग्य जमीन, मानवी आरोग्य इत्यादीसह आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, राळ, कोदा इत्यादी तृणधान्याचा ऋतुचक्रानुसार समावेश व उपयोग, तृणधान्य व अन्न प्रक्रिया संबंधी शासकीय योजना, तृणधान्य शेतीतून स्वयंरोजगार निर्मीती इत्यादी बाबत मार्गदशन केले.
यावेळी तृणधान्ये ओळख, प्रचार व प्रसार अंतर्गत राळा, कोदो, नाचणी या बियाणांचे वाटप शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण ६३ विदयार्थ्यानी सहभाग नोंदविला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा
डॉ. ए. एल. चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार डॉ. पी. एन सौदागर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागातील कर्मचारी रामचंद्र मिठाराम पाटील, ऋषिकेश कन्हैय्ये, देवांश मनोहर पाटील तसेच रविद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.