Home महाराष्ट्र पैठणच्या पाटेगाव पुलाखाली गंगेच्या नदीपात्रात पोत्यात बांधून टाकलेला मृतदेह हा गदेवाडीच्या कृष्णा...

पैठणच्या पाटेगाव पुलाखाली गंगेच्या नदीपात्रात पोत्यात बांधून टाकलेला मृतदेह हा गदेवाडीच्या कृष्णा धनवाडेचा, पोलिस तपासात माहिती निष्पन्न

पैठणच्या पाटेगाव पुलाखाली गंगेच्या नदीपात्रात पोत्यात बांधून टाकलेला मृतदेह हा गदेवाडीच्या कृष्णा धनवाडेचा, पोलिस तपासात माहिती निष्पन्न

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण जवळील पाटेगाव पुलाखाली गंगेच्या नदीपात्रात अज्ञात पुरूषाचा मृतदेह सोमवारी १५ डीसेंबर रोजी आढळून आला होता.सदर मयत झालेल्या अनोळखी इसमाचे अंदाजे (वय४०वर्षे) असावे. त्याच्या अंगामध्ये काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते. आणि काळ्या रंगाची पॅन्ट होती.उजव्या कानात सोनेरी रंगाची बाळीही होती.गळ्यात काळे मणी असलेली मॅग्नेट ची माळही होती. सदर प्रेत हे पैठण पोलिस स्टेशनच्या हद्दीत पाटेगाव येथील पुलाखाली गंगेच्या नदीपात्रात मिळून आले होते.असे वर्णन असलेला पुरुष जातीचा मृतदेह मिळून आल्याने पंचक्रोशीत सर्वत्र खळबळ उडाली होती.सदरचे वर्णन असलेली व्यक्ती कोणाच्याही ओळखीची असेल तर संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे

पोलीस निरीक्षक महादेव गोमारे साहेब यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस खात्यातर्फे करण्यात आले होते. पैठण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली असता सदर मृतदेह हा हातपाय बांधून पोत्यात घालून टाकलेल्या अवस्थेत गंगेच्या नदीपात्रात दिसुन आला होता.त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचे दिसून आले होते.संभाजीनगर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेऊन सदर मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी संभाजीनगर येथे पाठवून दिला असता उत्तरीय तपासणीत गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले होते.सदर व्यक्तीचा खून हा पुर्व वैमनस्यातून झाला असून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात घालून पैठण जवळील पाटेगाव पुलाखाली गंगेच्या नदीपात्रात टाकण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.सदर गुन्ह्याचा तपास हा स्थानिक गून्हे शाखेकडे देण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक सीपी पवार, उपनिरीक्षक प्रमोद यादव, सहायक फौजदार सुधिर ओहळ हवालदार नरेंद्र अंधारे,मुज्यू पठाण, भाऊसाहेब तांबे यांच्या पथकाने पैठण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील या प्रकरणात लक्ष घातले होते. आणि मयत झालेल्या अनोळखी व्यक्तींच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्याचे फोटो अहिल्यानगर, नाशिक,बीड, जालना,संभाजी नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पोलिस स्टेशनला पाठवून दिले होते.पोलीस तपास करीत असताना जिल्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांना या मयत तरूणांची ओळख पटविण्यासाठी यश आले होते.या मयत झालेल्या अनोळखी तरुणाचे नाव “कृष्णा पंढरीनाथ धनवाडे “असे असुन तो अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील रहिवासी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.संभाजीनगर जिल्हा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसींग रजपूत,यांच्या मार्गदर्शना खालील पोलिस पथकातील सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे,महेश बीरुटे, अशोक वाघ, संजय तांदळे, सचिन राठोड, सुनिल गोरे,बलवीरसींग बहुरे यांच्या पोलिस पथकाने थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गदेवाडी गाठून गावात जाऊन सदरील खून हा पूर्ववैमनस्यातून झाला आहे की काय की अजून काही वेगळ्या कारणाने झाला आहे या दिशेने तपास सुरू केला आहे.आरोपी कितीही धुर्त असला तरी त्याला निश्चितच जेरबंद करण्यात येईल अशी ग्वाही पोलिस पथकाने दिली आहे. “कानून के हाथ बहोत लंबे होते है” या चित्रपटातील वाक्याची आठवण येथे आल्या शिवाय राहत नाही.पैठण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील हे नुकतेच पैठण येथे रूजू झाले आहेत.या पुर्वी ते शेवगाव येथे कार्यरत होते त्यामुळे त्यांना शेवगाव तालुक्यातील गदेवाडी भागातील ठीकाणांची खडानखडा माहिती आहे.आरोपींना निश्चितच जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. कृष्णा धनवाडे याचा खून नेमका कोणत्या कारणाने झाला आहे हे आता पोलिस तपासात उघड होणार आहे.

Don`t copy text!