पाचोऱ्यात जिल्हाधिकारी यांना पत्रकारांनी मिडिया कक्षाच्या मागणीचे दिले निवेदन
पाचोरा, प्रतिनिधी
पाचोरा शहर व तालुक्यातील विविध पत्रकार संघटनेचे तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे संपादक
तथा संपादकीय मंडळातील पदाधिकारी तसेच प्रतिनिधींतर्फे पत्रकारांसाठी मिडिया कक्ष उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीचे निवेदन पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे, तहसिलदार प्रविण चव्हाणके, प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. अरप्रित चव्हाण उपस्थित होते. तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांना देण्यात आले आहे. निवेदन देते प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी, विनायक दिवटे, शामकांत सराफ, प्रविण ब्राम्हणे, दिलीप जैन, सुरेश तांबे, अनिल (आबा) येवले, नंदकुमार शेलकर, राहुल महाजन, गणेश शिंदे, कुंदन बेलदार, बंडु सोनार, चंचल सोनवणे, दिपक गढरी, जाविद शेख, निखिल मोर, दिलीप पाटील, दिलीप परदेशी, प्रतिक महाजन, छोटु सोनवणे, गजानन गिरी, प्रविण बोरसे उपस्थित होते.
पाचोरा शहरात मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार बांधवांना स्वतंत्र असे कोणतेही पत्रकार कक्ष नाही म्हणून पाचोरा शहरातील हुतात्मा स्मारकासमोरील जुने महात्मा गांधी वाचनालयाच्या गेटची जागा तात्पुरता स्वरूपात भिंत उभारून बंद करण्यात आली आहे. सदरची जागा सर्वस्वी पाचोरा नगरपालिका मालकी हक्क कायम ठेवून पाचोरा नगरपालिका मिडीया कक्ष नावाने देण्यात आली तर सर्वांना सोयीचे होईल. तरी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही
होवून आम्हाला ती जागा मिळावी. अशा आषयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी अमन मित्तल व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांना देण्यात आले आहे.