जय हिंद लेझीम मंडळ कृष्णापूरी चे वैरी का??
पाचोरा प्रतिनिधी……!! ķ पाचोरा शहरात कुठे ही रक्त लागणार असले तर सर्वात पहिले नाव निघते ते कृष्णापूरीच डॉक्टर किवा रक्त पिढी वाले नाव सांगतात की कृष्णापूरी भागातील युवक रक्तदान करणार आणि ते सत्य पण आहे आज पर्यंत कोणीही निराश झाले नाही,आले म्हणजेच रक्तदाते भेटले आहेत!!
आज पाचोरा शहरात सर्वात जास्त पोलिस हे कृष्णापूरी भागातील आहेत!!
भारतीय फोर्स मध्ये आर्मी, बी.एस.एफ. मध्ये कृष्णापूरी भागातील युवक आहे!!
विविध शासकीय नोकरीत कृष्णापूरी भागातील युवक आहेत!!
न्यायालयीन क्षेत्रात सर्वात जास्त युवक हे कृष्णापूरी भागातील आहेत!!
तसेच वकील म्हणुन कृष्णापूरी भागातील युवक आहेत!!
तसेच शिक्षण क्षेत्रात शिक्षक व प्राध्यापक युवक कृष्णापूरी भागातील आहेत!!
कोणत्याही गोष्टी करता धाऊन जाणारे युवक कृष्णापूरी भागातील आहेत!!
तसेच संपुर्ण पाचोरा शहरात व्यवसायिक म्हणून प्रसिद्ध युवक कृष्णापूरी भागातील आहेत!!
पाचोरा शहरातील लोकांचा खूपच गैरसमज आहे की इथले लोक अशिक्षित व भांडकुदळ आहे व निवडणूक आली की कृष्णापूरी भागातील नागरिकांचे कुठे ना कुठे भांडण होते पण आज पर्यंत कृष्णापूरी भागातील भांडण झाले अशी नोंद नाही आहे राजकारण दोन दिवस च असते हेही महिती आहे निवडणूक संपली म्हणजेच सर्व नागरिक आपल्या मधे एकत्र येता!!
कृष्णापूरी भागातून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निघते ही जयंती लक्षवेधी असते तर शहर व तालुक्यामधील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते हे युवकही कृष्णापूरी भागातीलच आहेत!!
कृष्णापूरी भागांत लायब्ररी ही पण एक अभिमानाची बाब आहे की इथे कोणतीही फी न घेता मोफत लायब्ररी आहे.आणि कृष्णापूरी भागातील युवकच नव्हे तर शहर व तालुक्यातील युवक इथे येऊन अभ्यास करता आणि इथे अभ्यास करून बरेच युवक हे शासकीय सेवेत काम करत आहेत!!
इथे भव्य व्यायाम शाळा असुनपण इथे कोणतीही फी न घेता व्यायाम करता येतो आणी तेही शहरातील व ग्रामीण भागातील युवकांना!!
तसेच थोर विचारवंत व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केलं जातं आणि इथे शहरातील नागरिकांची उपस्थिती असता हेही कृष्णापूरी भागातील युवक करतात!!
तसेच राजकीय क्षेत्रात कृष्णापूरी भागातील युवक मोठ्या प्रमाणात आहेत पण त्यांचं खच्चीकरण करुन दाबण्यात येते कारण कृष्णापूरीची एकता ही संपुर्ण तालुकाचे चित्र बदल करु शकतात हे सुद्धा निश्चित आहे!!
तसेच पत्रकार म्हणून कृष्णापूरी भागातील युवक जास्त प्रमाणात आहेत!!
सर्व गुण असुन का असे वैरी सारखे पाहता, मान्य आहे की सर्व जण सारखे नाहीत काही बोटावर मोजण्या सारखे आहेत,उपद्रवी पण हेही निश्चीत आहे की पाचही बोटं सारखे नसतात एक कुंटूब मध्ये चार भाऊ असले तर सर्व सारखे नसतात एक जरी वाईट असला तर तीन जणांना दोष देऊन काही फ़ायदा नसतो!!
सदर माहिती मी एक कृष्णापूरी भागातील नागरिक म्हणून सत्यता काय आहे ती मी थोडक्यात मांडून काही लोक कृष्णापूरी बदल गैरसमज करतात त्याबद्दल माहिती देत आहे!!
!! शब्दांकन जनलक्ष्य मुख्य संपादक प्रमोद दादा बारी !!