दिव्यांग व्यक्तींचे प्राथमिक तपासणी शिबिर संपन्न
आमदार निधीतून शिवसेनेने राबविला उपक्रम, सुमारे १३०० दिव्यांगांना मिळणार लाभ
पाचोरा-(वार्ताहर) दि,१४
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने
पाचोरा मतदार संघात आमदार किशोर पाटील यांच्या आमदार स्थानिक विकासनिधीतून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव यांच्या सहकार्याने प्रथमच दिव्यांग व्यक्तींसाठी भडगाव व पाचोरा या दोन्ही ठिकाणी प्राथमिक सहाय्यक साहित्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात भडगाव शुक्रवारी शिवसेना कार्यालयात झालेल्या शिबिरात सुमारे साडेपाचशे तर पाचोऱ्याला सातशे एकोणसाठ दिव्यांग बांधवानी या शिबीराचा लाभ घेत नोंदणी केली.
पाचोरा येथील महालपुरे मंगलकार्यालयात शनिवारी सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.किशोर पाटील हे होते यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी अशा प्रकारचे दिव्यांग बांधवांसाठी संपन्न होणारे हे पहिलेच शिबीर असून पाचोरा तालुक्यात असलेल्या दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेला हा एक अल्प प्रयत्न असून केवळ साहित्य वाटप करूनच नव्हे तर दिव्यांगांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवता यावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचे सांगून दिव्यांगांना मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कार्यालयात मदत कक्ष सुरू करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.पाचोरा व भडगाव मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींच्या आवश्यक सहाय्यक साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देणेसाठी आमदार निधीतून १० लाख रुपये मंजुर केले असून या शिबिरात सर्व प्रकारातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वागीण शारिरीक पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने विशेष पुनर्वसन तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार अस्थिव्यंग बांधवांसाठी तिनचाकी सायकल, व्हिल चेयर, कुबड्या, वॉकर, एलबो स्टिक, काठी, जयपुर फुट, कॅलीपर्स, आवश्यक ते सर्व कृत्रीम अवयव व सहाय्यक उपकरणे कर्णबधीर बांधवांसाठी डिजिटल कर्णयंत्र (जर्मन कंपनीचे) आवश्यकते नुसार इयर मोल्ड,अंध बांधवांसाठी इलेक्ट्रॉनिक्स अंध काठी, साधी अंध काठी, ब्रेल साहित्य मतीमंद वा गतीमंद बांधवांसाठी एमआर किट सेरेब्रल,सिटींग कॉर्नर चेयर, सि.पी चेयर इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.पाचोरा येथील कार्यक्रमात दिव्यांग बांधवांसाठी राज्यभर कार्य करणाऱ्या मीनाक्षी निकम यांनी आमदार किशोर पाटील यांनी प्रथमच असे शिबीर घेतल्याबद्दल सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.पी. गणेशकर यांनी केले तर समाज कल्याण अधिकारी अपंग पुनर्वसन भरत चौधरी, मीनाक्षी निकम यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला विधानसभा संपर्क प्रमुख सुनिल पाटील, माजी जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील,दिपकसिंग राजपूत, उद्धव मराठे,तालुका प्रमुख शरद पाटील, नगराध्यक्ष संजय गोहील,उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर,किसान सेनेचे अरुण पाटील, शरद पाटे, पप्पू राजपूत,स्वीय सहाय्यक राजेश पाटील,प्रवीण ब्राह्मणे,सुमित पाटील, वैभव राजपूत,राजेंद्र पाटील, अनिल पाटील,सागर पाटील, अनिकेत सूर्यवंशी, उद्धव मराठे,,बापू हटकर,गणेश चौधरी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले तर आभार गणेश पाटील यांनी मानले

























