सु.भा.पाटील शाळा तर्फे गुरूपौर्णिमा तसेच लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती निमित्त ऑनलाईन स्पर्धा संपन्न

सु.भा.पाटील शाळा तर्फे गुरूपौर्णिमा तसेच लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती निमित्त ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली होती

पाचोरा प्रतिनिधी सु.भा.पाटील शाळा तर्फे गुरूपौर्णिमा निमीत्त तसेच लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सु.भा.पाटील शाळा तर्फे वॉट्सएप्प वर ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता त्यामध्ये विद्यार्थी मुली नी बाजी मारुन बक्षिसं पटकावले यात विद्या गढरी, आरध्या प्रमोद बारी, राज सपकाळे,पवन भोई,यांनी तर सेतु अभ्यास क्रमात अव्वल ठरत अंजली माळी,अंकिता पाटील,गौरी गायकवाड,तुप्ती महाले,अन्न्या धनराळे,कार्तिक पाटील,भावेश सावंत,मयुरी लोणारी, राज पवार,यश आहिरे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री नारायण सोनवणे सर होते. तसेच स्वप्निल माने सर.रविद्र महाले सर.संदीप शेवरे सर.ईश्वर पाटील सर.श्रीमती शितल पाटील मैडम.राकेश पाटील सर.वीरेंद्र पाटील सर.यांच्या शुभ हस्ते विद्यार्थी व पालक यांना विविध बक्षिसं देऊन गौरवण्यात आले, सूत्र संचलन मनोज पवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रविंद्र महाले सर यांनी मानले व छायाचित्रण राकेश पाटील सर यांणी केले.