Home पाचोरा तालुका महात्मा गांधी विद्यालय सामनेर एनसीसी तर्फे स्वच्छता ही सेवा उपक्रम

महात्मा गांधी विद्यालय सामनेर एनसीसी तर्फे स्वच्छता ही सेवा उपक्रम

महात्मा गांधी विद्यालय सामनेर एनसीसी तर्फे स्वच्छता ही सेवा उपक्रम

 

येथील महात्मा गांधी विद्यालय सामनेर राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने स्वच्छता ही सेवा उपक्रम राबवण्यात येत आहे महात्मा गांधी विद्यालय चे स्थानिक कुल कमिटी चेअरमन श्री बाळकृष्ण जगन्नाथ पाटील, मुख्याध्यापक श्री आर आर भोसले व 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव चे समादेशक अधिकारी कर्नल अभिजीत महाजन प्रशासकीय अधिकारी कर्नल अश्विन वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी अधिकारी श्री नारायण वाघ यांनी 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर स्वच्छता ही सेवा उपक्रमा दरम्यान विद्यालयातील परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

 

केंद्र सरकारच्या स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता या अंतर्गत येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी स्वच्छतेची आदरांजली वाहनाचा उपक्रम नियोजित केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून परिसराला प्लास्टिक मुक्त करणे तसेच विद्यार्थी शिक्षक व पालकांमध्ये स्वच्छतेचे जनजागृती करणे हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी उपस्थित एनसीसी कॅडेटने घर,परिसर,विद्यालय स्वच्छ सुंदर व आरोग्यदायी राखण्यासंबंधी प्रतिज्ञा घेतली समाजातील प्रत्येक घटकापर्यंत स्वच्छते संबंधित जनजागृती केली जाईल असे व्रत घेतले यशस्वीतेसाठी एनसीसी कॅडेट्स यांनी परिश्रम घेतले.

Don`t copy text!