केंद्र शासनाने केलेल्या रासायनिक खते ,पेट्रोल ,डिझेल,गॅस दरवाढी विरोधात पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध

केंद्र शासनाने केलेल्या रासायनिक खते ,पेट्रोल ,डिझेल,गॅस दरवाढी विरोधात पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध

पाचोरा प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन.

पाचोरा प्रतिनिधी
केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किमती मध्ये 500 ते 700 रुपये दर वाढ केलेली आहे ,सध्या कोरोना ,लोकडाऊन व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले त्यात .झालेली रासायनिक खतांची दरवाढ पेट्रोल ,डिझेल,व गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य शेतकरी जनता होरपळून गेलेली आहे .हि झालेली दर वाढ सर्वसामान्य, शेतकरी व जनतेस न परवडणारी असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता रासायनिक खतांवरील सबसिडी व पेट्रोल ,डिझेल,व गेस यांचे कर कमी करून महागाईतून शेतकरी व सर्वसामान्य जनता यांना दिलासा देण्यात यावा .यासाठी आज पाचोरा प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे याना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र शासनाने दरवाढी कमी न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकडाऊनचे सर्व नियम पाळून रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करेल असा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व नगरसेवक विकास पाटील यांनी ईशारा दिला आहे.