श्री. गो .से हायस्कूल येथील विद्यार्थ्यांचे नवोदय परीक्षेत यश
पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से हायस्कूल पाचोरा येथील इयत्ता सातवी ग चा विद्यार्थी यश लक्ष्मण शिंदे हा नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाला असून नवोदय प्रवेश साठी पात्र ठरला आहे.
त्याचे शाळेचे मुख्याध्यापक एन. आर.पाटील .यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर उप मुख्याध्यापक आर. एल. पाटील. पर्यवेक्षिका अंजली गोहिल,पर्यवेक्षक आर. बी. तडवी,आर बी बांठिया ज्येष्ठ शिक्षक पी. एम. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका संगीता वाघ यांनी अभिनंदन केले सोबत विद्यार्थ्यांचे पालक लक्ष्मण शिंदे उपस्थित होते. त्याला शिक्षिका व्ही.पी जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.